Jalgaon Agriculture News : शहरासह जिल्ह्यात जुलैमध्ये आतापर्यंत केवळ सरासरी ६७.५ मिलिमीटर पाऊस झाला आहे. जुलैमध्येही पाऊस नव्हता. मात्र, बुधवार (ता. ५) व गुरुवार (ता. ७) पेरणीयोग्य पाऊस झाल्याने सर्वच ठिकाणी पेरण्यांना गती आली आहे.
या पावसामुळे ४९ टक्के पेरण्या झाल्या आहेत. सर्वाधिक पेरा कापसाचा ६६ टक्के आहे. यात बागायती कापसाचा पेरा ५० टक्के आहे. गेल्या २४ तासांत (सकाळी आठपर्यंत) २४.८ मिलिमीटर पाऊस झाला आहे. या महिन्यात ३५ टक्के पाऊस झाला. (49 percent sowing due to heavy rain in jalgaon agriculture news)
जूनचे २६ दिवस पावसाअभावी कोरडे गेले. नंतर थोडाफार पाऊस झाला. मात्र, शेतकऱ्यांना ५ जुलैपर्यंत दमदार पावसाची प्रतीक्षा होती. बुधवारी व गुरुवारी दमदार पाऊस झाल्याने शेतकरी पेरण्या पूर्ण करण्यासाठी सरसावले आहेत. जो-तो पेरण्या पूर्ण कशा होतील, यासाठी मजुरांची जुळवाजुळव करण्यात गुंतला आहे.
बागायतदार शेतकऱ्यांनी कापसाच्या पेरण्या ५० टक्के केल्या. त्या आता शंभर टक्के पूर्ण होतील. कोरडवाहू शेतकऱ्यांच्या पेरण्या खोळंबल्या होत्या. आता पाऊस झाल्याने पेरण्यांना वेग आला आहे. शेतात सर्वत्र पेरण्यांचे चित्र दिसत आहे.
आतापर्यंत कापसाचा पेरा तीन लाख ३३ हजार ५२९ हेक्टरवर झाला आहे. सोयाबीनचा पेरा चार हजार हेक्टरवर, तर भुईमुगाचा पेरा तीन हेक्टरवर झाला आहे. उडीद, मूग, तुरीच्या पेरण्या झालेल्या नाहीत. आतापर्यंत तीन लाख ७८ हजार ६३० हेक्टरवर खरिपाच्या पेरण्या पूर्ण झाल्या आहेत.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
१५ जुलैपर्यंत पेरण्या करता येतील
उडीद, मूगवगळता कापूस, मका, सोयाबीन, ज्वारी, बाजरी, तूर या पिकांच्या पेरण्या १५ जुलैपर्यंत करता येतील. आता मात्र पावसाने वेग घेतला आहे. यामुळे रखडलेल्या पेरण्या पूर्ण होतील, अशा आशावाद शेतकरी व्यक्त करीत आहेत.
तालुकानिहाय झालेल्या पेरण्या अशा
तालुका---पेरण्या (हेक्टर)--टक्केवारी
जळगाव--२५ हजार २६--४४
भुसावळ--१२ हजार ९९४--४५
बोदवड--१६ हजार ४८८--५०
यावल--आठ हजार ७२४--२०
रावेर--१६ हजार ५५८--५६
मुक्ताईनगर--१४ हजार ५६६--४९
अमळनेर--४२ हजार ४००--६१
चोपडा--४० हजार ४६७--६३
एरंडोल--२९ हजार ९९०--७६
धरणगाव--१९ हजार २६७--४३
पारोळा--३५ हजार ९११--६९
चाळीसगाव--२३ हजार ६८०--२७
जामनेर--६८ हजार १९--६८
पाचोरा--२२ हजार ९००--४०
भडगाव--एक हजार ६४०--५
एकूण--तीन लाख ७८ हजार ६३०--४९
चार मंडलात अतिवृष्टी...
जिल्ह्यातील चार मंडलांत अतिवृष्टी झाल्याची नोंद आहे. त्यात शेळावे (ता. पारोळा) ८८ मिलिमीटर पाऊस, बर्दापूर (ता. पारोळा) ६१, शिरूड (ता. अमळनेर) ८६.८, पिंप्री (ता. धरणगाव) ६८.८ मिलिमीटर पाऊस झाल्याची नोंद झाली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.