Jalgaon News : डॉ. आंबेडकर सामाजिक विकास योजनेंतर्गत जळगाव ग्रामीणमध्ये 5 कोटी रुपयांचा निधी मंजूर

जळगाव तालुक्यातील २८ कामांसाठी ३ कोटी ५ लाख तर धरणगाव तालुक्यातील १५ कामांसाठी १ कोटी ९५ लाख अशा एकूण ४३ कामांसाठी ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला.
Guardian Minister Gulabrao Patil
Guardian Minister Gulabrao Patilesakal
Updated on

Jalgaon News : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेंतर्गत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या मागणीनुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघासाठी मागासवर्गीय वस्तीत मुलभूत सुविधा व सुधारणांसाठी जळगाव तालुक्यातील २८ कामांसाठी ३ कोटी ५ लाख तर धरणगाव तालुक्यातील १५ कामांसाठी १ कोटी ९५ लाख अशा एकूण ४३ कामांसाठी ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला.

कामांची निविदा प्रक्रिया व वर्क ऑर्डर आचार संहिता लागण्याच्या आत करण्याचे निर्देश समाज कल्याण विभागाला दिले आहेत. (5 Crore Fund approved in Jalgaon Rural under dr Ambedkar Social Development Scheme news)

जळगाव व धरणगाव तालुक्यातील मागासवर्गीय वस्ती असलेल्या म्हसावद (२० लाख), आमोदे बु. (१५ लाख), बांभोरी प्र.चा. (२५ लाख), दोणगाव बु. (१० लाख) येथे सामाजिक सभागृह तर गाढोदा, पाथरी, लाडली, मुसळी, येथे प्रत्येकी १० लाख तर पिंप्री व चिंचपुरा येथे प्रत्येकी २० लाख प्रमाणे येथे कॉंक्रीट गटार बांधकाम मंजूर केले आहे.

बिलवाडी, विटनेर, जळगाव खुर्द, उमाळा, भादली बुद्रूक, वसंतवाडी, रिधुर, डोमगाव, बोरणार, विदगाव, आव्हाणे, कानसवाडे, धानोरा, चावलखेडा, निंभोरा येथे प्रत्येकी १० लाख प्रमाणे रस्त्यांचे काँक्रिटीकरण मंजूर झाले असून विटनेर, कानळदा, पथराड बुद्रूक, बोरखेडा, पथराड खुर्द, निशाणे, मोहाडी, धानोरा खुर्द, भादली खुर्द.

Guardian Minister Gulabrao Patil
Jalgaon Cotton News : हंगाम संपला तरी कापसाला नाही उठाव; यंदा केवळ 7 लाख गाठींचे उत्पादन

आसोदा, नांद्रा खुर्द, शेळगाव, नांद्रा बुद्रूक, पाळधी खुर्द, सावखेडा बुद्रूक येथे प्रत्येकी १० लाख प्रमाणे पेव्हिंग ब्लॉक मंजूर झाले आहेत. भवरखेडे येथे खडीकरण व मुरमीकरण, जळके येथे चौक सुशोभीकरण व भोकर येथे मिनी हायमास्ट प्रत्येकी १० लाख प्रमाणे अशी कामे मंजूर केली आहेत.

"प्रत्येक गावातील वस्तीत आवश्यक त्या ठिकाणी मुलभूत सुविधा मोठ्या प्रमाणात शासन मंजूर करीत आहे. दरवर्षी प्रत्येक वस्तीत सर्व सोयी सुविधा निर्माण होण्यासाठी जास्तीत जास्त निधी मंजूर करण्याचा प्रयत्न केला असून आज जळगाव ग्रामीणमध्ये ५ कोटींचा निधी मंजूर केला आहे. शासनाच्या विविध कल्याणकारी योजना जनतेपर्यंत पोहचत असून मागासवर्गीयांच्या विकासासाठी कोणत्याही निधीची कमतरता पडू देणार नाही." - पालकमंत्री गुलाबराव पाटील

Guardian Minister Gulabrao Patil
Jalgaon News : यंत्रणांच्या उदासीनतेने हायकोर्टाची ‘तारीख पे तारीख’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.