Gold Silver Rate : चांदीत 5 हजारांची घसरण; आंतरराष्ट्रीय बाजारपेठेचा परिणाम

5000 fall in silver due to effect of international market jalgaon
5000 fall in silver due to effect of international market jalgaonesakal
Updated on

Gold Silver Rate : आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत डॉलरचे भाव घसरल्याने ७८ हजार प्रतिकिलोवर पोचलेली चांदी पाच दिवसांत पाच हजारांनी घसरून ७३ हजारांवर आली आहे. सोनेही ६३ हजार ८०० पर्यंत गेले होते.

त्यात १८०० घसरण होऊन ते ६२ हजारांवर आले आहे. (5000 fall in silver due to effect of international market jalgaon news)

दिवाळीनंतर येणाऱ्या लग्नसराईमुळे सोने-चांदीला मागणी वाढली होती. दिवाळीच्या पर्वात सोने तेजीत होते. आता लग्नसराईत सोने तेजीत आहेच. गेल्या ४ डिसेंबरला सोन्याचे दर ६३ हजार ८०० रुपये प्रतितोळा पोचले होते. तर चांदी ७८ हजार रुपयांपर्यंत पोचली होती. यामुळे सोने-चांदी विकत घेणाऱ्यांमध्ये दराबाबत धास्ती होती.

सोन्याचा भाव ६१ हजार ते ६१ हजार ३०० रुपये प्रतितोळा आणि चांदीचा भाव किलोला ७२ ते ७३ हजार रुपये दिवाळीच्या पर्वात १० ते १६ नोव्हेंबरदरम्यान होता. तुलसी विवाहानंतर लग्नाचा धडाका सुरू झाला आहे. त्यामुळे सोन्याला मागणी वाढली आहे. लग्नासाठी मणी मंगळसूत्र, बांगड्या, कानातील डूल, चंद्रहार, नथ, चांदीचे पैंजण, जोडवे यांना मागणी असते.

चांदीत उसळी अन् घसरणही

चांदी १२ ऑक्टोबरला ७१ हजार प्रतिकिलो होती. ३१ ऑक्टोबरला ती ७४ हजारांवर गेली. १४ नोव्हेंबरला चांदीचा भाव ७१ हजारांपर्यंत खाली आला. २७ नोव्हेंबरला चांदीच्या दरात उसळी होऊन भाव ७६ हजारांवर गेला. तर ४ डिसेंबरला उच्चांक गाठत ७८ हजारांपर्यंत चांदी पोचली होती. ती आज ७३ हजारांपर्यंत खाली आली आहे.

5000 fall in silver due to effect of international market jalgaon
Gold-Silver Rate: सणासुदीच्या काळात इस्रायल आणि पॅलेस्टाईन युद्धामुळे सोने महागणार, काय आहे कारण?

सोने-चांदीचा भाव

(सोन्याचा तोळ्याला आणि चांदीचा किलोचा)

(विनाजीएसटी )

ातारीख सोने चांदी

३१ ऑक्टोबर-- ६१ हजार ३००-- ७४ हजार

१० नोव्हेंबर-- ६१ हजार-- ७२ हजार

१४ नोव्हेंबर-- ६० हजार ३००-- ७१ हजार

१७ नोव्हेंबर-- ६१ हजार ३००-- ७५ हजार

२७ नोव्हेंबर-- ६२ हजार-- ७६ हजार

२९ नोव्हेंबर-- ६२ हजार ८००-- ७७ हजार

४ डिसेंबर-- ६३ हजार ८००-- ७८ हजार

५ डिसेंबर-- ६२ हजार ६००-- ७६ हजार

९ डिसेंबर-- ६३ हजार-- ७३ हजार

5000 fall in silver due to effect of international market jalgaon
Gold Silver Rate: लग्नसराईमुळे सोने, चांदीला झळाळी! चांदी पोचली किलोला 77 हजारांवर अन सोने....

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.