Market Committee Election : रावेर बाजार समितीसाठी 51 उमेदवार रिंगणात

Jalgaon Market Committee election
Jalgaon Market Committee electionesakal
Updated on

Jalgaon News : येथील बाजार समितीच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी १८ जागांसाठी ५१ उमेदवार रिंगणात राहिले आहेत. (51 candidates in election for Raver market Committee election jalgaon news)

यात काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेस - शिवसेना (उद्धव ठाकरे गट) यांची महाविकास आघाडी व भारतीय जनता पक्ष - शिवसेना (शिंदे गट) यांच्यात सर्व १८ जागांसाठी चुरशीची लढत होणार आहे. आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षानेही आपले १० उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवले आहेत.

या निवडणुकीत सर्वाधिक चुरस विकास सोसायटीच्या सर्वसाधारण गटात आहे. ७ जागांसाठी येथे तब्बल २३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. महिला राखीवच्या २ जागांसाठी ४ उमेदवार, इतर मागासवर्ग प्रवर्गाच्या १ जागेसाठी २ उमेदवार, अनुसूचित जाती जमातीच्या १ जागेसाठी ५ उमेदवार, ग्रामपंचायतच्या सर्वसाधारण गटातून २ जागांसाठी ६ उमेदवार, ग्रामपंचायतच्या अनुसूचित जाती जमाती गटातून १ जागेसाठी ३ उमेदवार, आर्थिक दुर्बल घटकासाठीच्या १ जागेसाठी २ उमेदवार, व्यापारी गटातून २ जागांसाठी ४ उमेदवार आणि हमाल मापारी मतदारसंघातून १ जागेसाठी २ उमेदवार रिंगणात आहेत.

दरम्यान, आज राष्ट्रवादी काँग्रेसचे शेतकरी आघाडीचे जिल्हाध्यक्ष सोपान पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. महाविकास आघाडीच्या पॅनलमध्ये डॉ. राजेंद्र पाटील, कैलास सरोदे आणि सय्यद अजगर सय्यद तुकडू हे तीन विद्यमान संचालक पुन्हा निवडणूक लढवत आहेत तर भाजप पुरस्कृत पॅनलमध्ये गोंडू महाजन, दिलीप पाटील, गोपाळ नेमाडे आणि कल्पना पाटील हे चौघे विद्यमान संचालक पुन्हा आपले भवितव्य आजमावत आहेत.

हेही वाचा : What Is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’

Jalgaon Market Committee election
Market Committee Election : बोदवडला आघाडीत बिघाडी; राष्ट्रवादी, शिवसेना भाजप युतीची सरळ लढत

भाजपचेच ज्येष्ठ कार्यकर्ते पितांबर पाटील यांना भाजपच्या पॅनलमध्ये जागा न मिळाल्याने ते स्वतंत्र उमेदवार म्हणून निवडणूक लढवीत आहेत तर राष्ट्रवादी काँग्रेसचे गणेश महाजन देखील निवडणुकीच्या रिंगणात आहेत. मावळते संचालक राजीव पाटील यांचे सुपुत्र पंकज पाटील निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, ज्येष्ठ कार्यकर्ते व रावेर पीपल्स बँकेचे अध्यक्ष एस. आर. चौधरी यांनीही महाविकास आघाडीच्या पॅनेलमध्ये वर्णी न लागल्याने आपली स्वतंत्र उमेदवारी कायम ठेवली आहे.

तर मावळत्या संचालक मंडळातील माजी सभापती श्रीकांत महाजन यांच्यासह नीळकंठ चौधरी, विनोद पाटील, प्रमिला पाटील, प्रमोद धनके, अरुण पाटील, योगेश पाटील हे निवडणूक रिंगणापासून लांब आहेत. मावळते संचालक मंडळ हे सर्वपक्षीय होते. त्यांनी ७ वर्षात सर्व ठराव एकमताने संमत केले आहेत. त्यामुळे ते एकमेकांवर टीका टिप्पणी करतील काय, आता प्रचारात एकमेकांविरुद्ध ते काय मुद्दे मांडतील हे पाहणे औसुक्याचे ठरणार आहे.

Jalgaon Market Committee election
Pachora Market Committee Election : 59 उमेदवार रिंगणात; 168 उमेदवारांची माघार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.