Jalgaon News : रेल्वे ट्रॅकच्या फ्रॅक्चर्स घटनांत 51 टक्के घट

Workers repairing fractures in railway tracks.
Workers repairing fractures in railway tracks. esakal
Updated on

Jalgaon News : रेल्वेमध्ये नवनवीन तंत्रज्ञान येत असल्याने कामाचा वेग वाढला आहे. पूर्वी रेल्वे रुळ टाकण्यासाठी अनेक दिवस लागायचे, नवीन तंत्रज्ञानामुळे आता कमी वेळ लागतो.

भुसावळ विभागात नवीन तंत्रज्ञानाच्या वापरामुळे ट्रॅकच्या रेल्वे फ्रॅक्चर्स, वेल्ड फेल्युअर्समध्ये घट झाली. (51 percent reduction in fracture incidents of railway tracks jalgaon news)

नवीन तंत्रज्ञानामुळे मागील वर्षातील ४९ घटनांच्या तुलनेत या आर्थिक वर्षात केवळ २४ घटना झाल्या. यामुळे रेल्वे फ्रॅक्चर्स, वेल्डिंग ऑफ ट्रॅक्समध्ये ५१ टक्के घट झाली आहे.

भुसावळ विभागाचे विभागीय रेल प्रंबधक (डीआरएम) एस. एस. केडिया यांच्या मार्गदर्शनाखाली व वरिष्ठ विभागीय अभियंता (समन्वय) तरुण दंडोतिया यांच्या नेतृत्वाखाली भुसावळ विभागात २०२२-२३ या आर्थिक वर्षात पायाभूत सुविधा आणि ट्रॅक सुरक्षासाठी सिव्हील इंजिनीअरिंग विभागाद्वारे विविध ट्रॅक कार्ये करण्यात आली आहेत.

ज्यामुळे रेल्वेचे दळणवळणाचे मार्ग चांगले सुरक्षीत राहात आहेत. भुसावळ विभागात यंदा १८३ किमी ट्रॅकचे नूतनीकरण करण्यात आले. मागील वर्षी ते १६३ किमी होते. तसेच, ११० किलोमिटर ट्रॅकचे डीप स्क्रीनिंग झाले, गेल्या वर्षी केवळ ८२ किमी ट्रॅकचे स्क्रीनिंग झाले होते. लेव्हल क्रॉसिंग गेट्सचे निर्मूलनात विभागात २४ लेव्हल क्रॉसिंग गेट्स काढण्यात आले असून, ३२ नवीन आरयूबी बांधून कार्यान्वित करण्यात आले.

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

Workers repairing fractures in railway tracks.
Girish Mahajan News : वैद्यकीय संकुलाची इमारत दीड वर्षात होणार पूर्ण : गिरीश महाजन

भादली, जळगाव, शिरसोली, म्हसावद, माहेजी, पाचोरा अशा ७२ किलोमिटरचा लूप लाइनचा वेग १५ किलोमिटर प्रतितासवरून ३० किलोमिटर प्रतितास करण्यात आला आहे. याशिवाय, विभागातत .०३१८ हेक्टर क्षेत्रातून १८४ अतिक्रमणे काढण्यात आली.

तर, गेल्यावर्षी अल्ट्रासोनिक मशीनद्वारे मागील वर्षी आठ हजार ६१४ किमीच्या तुलनेत यंदा नऊ हजार ४९८ कि. मी. मार्गाची तपासणी करण्यात आली. म्हणजेच मागील वर्षापेक्षा सुरक्षा तपासणीत १० टक्के वाढ झाली आहे.

दरम्यान, भुसावळ मंडळातील सध्याच्या ४४ पुलांची सुरक्षितता सुनिश्‍चित करण्यासाठी पुनर्बांधणीचे काम पूर्ण झाले आहे. चाळीसगाव ते धुळे या ५६ किमी लांबीचा वेग ताशी १०० किलोमिटरवरून ११० किलोमिटर प्रतितास करण्यात आला आहे.

Workers repairing fractures in railway tracks.
Jalgaon News : नवे वाळू धोरण फायद्याचे, पण, अवैध उपशाचे काय?

भुसावळ बसस्थानकाजवळची जमीन आरएलडीएला ४५ वर्षांसाठी भाडेतत्त्वावर देण्यात आली, त्यातून रेल्वेला ९.१६ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले. अमरावतीमध्ये ही जमीन आरएलडीएला ४५ वर्षांसाठी भाडेतत्त्वावर देण्यात आली असून, त्यातून रेल्वेला ४५ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. सिव्हील इंजिनीअरिंग विभागाची विविध कमाई २२ कोटी २० लाख म्हणजेच गेल्या वर्षीच्या १२.६९ कोटींपेक्षा १७५ टक्के अधिक आहे.

७७४ कोटींची विकास कामे

विभागातील पायाभूत सुविधांच्या विकासासाठी यंदा ७७४ कोटी ८६ लाख रूपये वापरण्यात आले. जे विभागाला वाटप केलेल्या अनुदानाच्या जवळपास शंभर टक्के आहे. तसेच, भुसावळ विभागातील ४ फूट ओव्हर ब्रिज (एफओबी) पूर्ण झाले असून, प्रवाशांसाठी खुले करण्यात आले आहेत.

Workers repairing fractures in railway tracks.
Jalgaon Crime News : एरंडोलला मंदिराची अज्ञातांकडून तोडफोड

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.