Jalgaon News : हरवलेल्या किसान कार्डचा वापर करून अज्ञात आरोपीने आयसीआयसीआय बँकेच्या एटीएममधून ५१ हजार ७०० रुपये लंपास केल्याची घटना २६ ते २९ मे दरम्यान घडली. (51 thousand stolen from found bank Kisan credit card jalgaon crime news)
सविता प्रल्हाद पाटील (रा. साईबाबा मंदिराजवळ, पैलाड, अमळनेर) यांचे जानवे जेडीसीसी बँकेचे किसान क्रेडिट कार्ड २६ मेस हरवले होते. त्यांच्या कार्डवरच पिनकोड लिहिलेला होता.
दरम्यान, ते ३० मेस बँकेत कार्ड बंद करून पैसे काढायला गेले असता त्यांना बँकेच्या मॅनेजरने सांगितले, की तुमच्या कार्डवरून वेगवेगळ्या वेळी आणि तारखेला सुमारे ५१ हजार ७०० रुपये आयसीआयसीआय बँकेच्या एटीएममधून काढले गेले आहेत. महिलेला आपली रक्कम चोरी झाल्याचे लक्षात येताच अमळनेर पोलिस ठाण्यात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
दरम्यान, या प्रकरणी पोलिस निरीक्षक विजय शिंदे यांनी तपासात ज्या एटीएममधून परस्पर पैसे काढले गेले होते त्याचे सीसीटीव्ही फुटेज व इतर गोपनीय माहितीच्या आधारे पोलिस कर्मचारी सुनील हटकर, किशोर पाटील, दीपक माळी, रवींद्र पाटील, शरद पाटील, सिद्धांत शिसोदे यांचे पथक संशयितांच्या मागावर पाठवले.
संशयित प्रकाश पाटील याला पथकाने दरेगाव (ता. अमळनेर) येथील शेतातून ताब्यात घेतल्यावर त्याने एटीएममधून वेळोवेळी ५१,७०० रुपये परस्पर काढल्याची कबुली दिली. पुढील तपास पोलिस करत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.