अमळनेर (जि. जळगाव) : येथील पाडळसे धरण जनआंदोलन समितीच्यावतीने गुरुवारी (ता. ९) विक्रमी ५२ हजार पोस्टकार्ड भव्य मिरवणुकीने मुख्यमंत्र्यांच्या जन्मदिवसाानिमित्त मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या नावे अमळनेर टपाल विभागाचे पोस्टमास्तर ए. आर. साळुंखे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.'
धरणाचे आंदोलन आता जनतेच्या हातात देऊ व परिणामास शासन जबाबदार राहील' असा जाहीर इशारा समितीच्यावतीने देण्यात आला.( 52 thousand postcards were written to Chief Minister for Padalse Dam jalgaon news)
रणरणत्या उन्हामध्ये बळीराजा स्मारक येथे जमलेल्या हजारो आंदोलकांनी बळीराजाला पुष्पहार अर्पण करून क्रांतीची मशाल पेटविण्यात आली. जनतेने लिहिलेले हजारो पत्र ठेवून सजलेल्या बैलगाडी पुढे काढून मिरवणुकीचा शुभारंभ करण्यात आला. बैलगाडीपुढे जनआंदोलन समितीचे शेकडो कार्यकर्ते पांढरी गांधी टोपी घालून 'पाडळसे धरण झालेच पाहिजे ' घोषणा देत होते.
मिरवणूक विश्रामगृहपासून सुरू होऊन विजय मारोती, बसस्थानक, पाचपावली देवी, लालबाग शॉपिंग मार्गे, अग्रसेन महाराज चौकात आले. पोस्टऑफिस समोरील मैदानात यावेळी झालेल्या सभेत समितीच्या पदाधिकाऱ्यांनी ५२ हजार ५०० पोस्टकार्डचे गठ्ठे स्टेजवर पोस्ट मास्तर ए. आर. साळुंखे यांना सुपूर्द केले. या वेळी पोस्टमास्तर साळुंखे यांनी ५२ हजार ५०० पोस्टपत्र मिळाल्याचे सांगत तातडीने स्टॅम्पिंग करून मंत्रालयात पाठवण्यात येतील, असे जाहीर केले.
या वेळी समितीचे प्रमुख कार्यकर्ते रणजित शिंदे यांनी १९९७ पासून धरणाचे कासवगतीने चालणाऱ्या कामास, वाढणाऱ्या हजारो कोटींच्या किंमतीस राज्यकर्त्यांचा नाकर्तेपणा कारणीभूत ठरला असल्याचा घणाघाती आरोप केला. शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या समितीच्या सहनशीलतेचा अंत: पाहू नका, असा इशाराही दिला.
हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार
महेंद्र बोरसे यांनी पुनर्वसनाबाबतचे प्रश्न मांडत शासन कायद्यांच्या आड विस्थापितांना न्याय देण्यात दिरंगाई करते, असे सांगितले. धुळ्याचे माजी आमदार प्रा. शरद पाटील यांनी हजारो पत्रांची नोंद शासनाने न घेतल्यास आता समितीने आक्रमकपणे रस्त्यावर उतरावे, असे आवाहन केले.
माजी आमदार डॉ. बी. एस. पाटील यांनी जनआंदोलन समितीचे सुभाष चौधरी हा एकमेव माणूस सातत्याने धरणासाठी आपल्या कार्यकर्त्यांसह लढत असल्याने जनतेनेही आता निष्क्रिय नेत्यांना जागा दाखवावी, असे जाहीर आवाहन केले.
पाडळसे धरण जनआंदोलन समितीचे प्रमुख सुभाष चौधरी यांनी तालुक्यातील जनतेची सर्वपक्षीय मंत्री व नेत्यांनी निम्न तापी प्रकल्पाबाबत खोटी आश्वासन देऊन फसवणूक केल्याची जाहीर टिका केली. निर्णय न झाल्यास पत्रात लिहिल्यानुसार येणाऱ्या निवडणुकांवर बहिष्कार टाकला जाईल, असे जाहीर केले. आर. बी. पाटील यांनी मिरवणुकीत डफावर गीते सादर केली.
व्यासपीठावर समितीचे प्रमुख सुभाष चौधरी, पत्रकार संघाचे अध्यक्ष चेतन राजपूत, चंद्रकांत काटे, हेमंत भांडारकर, हिरामण कंखरे, रणजित शिंदे, महेश पाटील, सुनील पाटील, प्रशांत भदाणे, रवींद्र पाटील, रामराव पवार, गोकुळ पाटील, महेंद्र बोरसे, आर. बी. पाटील, अजयसिंग पाटील, गोकुळ बागूल, प्रवीण संदानशिव, प्रताप साळी, सुपडू बैसाणे, ॲड. तिलोत्तमा पाटील, प्रतिभा पाटील, राजश्री पाटील, पुरुषोत्तम शेटे, बापू चौधरी, रियाज मौलाना, रजाक शेख, नारायण बडगुजर,सुरेश पाटील, एस आर पाटील, डी के पाटील, सुशील भोईटे आदीं प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. संजय पाटील यांनी सूत्रसंचलन केले. महेश पाटील, सुनील पाटील यांनी आभार मानले.
विविध संघटनांचा सहभाग
मिरवणुकीत डॉ. अनिल शिंदे, मनोज पाटील, सुभाष पाटील, अशोक पाटील, अरुण देशमुख, मनोहर पाटील, धनगर पाटील, शिवाजी पाटील, प्रा. गणेश पवार, श्याम अहिरे, महेंद्र महाजन, रमेश धनगर, अनिल शिसोदे, दिगंबर महाले, भूषण भदाणे, सुनील शिंपी, नीलेश चौधरी,
कल्याण पाटील, सूरज परदेशी, प्रथमेश पवार, कुंदन खैरनार, मकसुद बोहरी, प्रितपालसिंग बगा, कीर्ती कोठारी, पांडुरंग महाजन, नावेद शेख, चंद्रकांत साळी, धनराज पाटील आदींसह रॉयल उर्दू स्कूल, ॲड. ललिता पाटील इंग्लिश स्कूल, पीबीए इंग्लिश स्कूल, सरस्वती विद्या मंदिर, माजी सैनिक संघटना, विविध राजकीय पक्षांचे नेते, कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते, विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.