Manmad Jalgaon Bhusawal Railway : तिसऱ्या लाईनचे 53 टक्के काम पूर्ण; 1 हजार 360 कोटींचा प्रकल्प

Work in progress of third railway line
Work in progress of third railway line
Updated on

Manmad Jalgaon Bhusawal Railway : मनमाड-जळगाव-भुसावळ दरम्यान तिसऱ्या रेल्वे लाईनचे काम ५३ टक्के पूर्ण झाले असल्याची माहिती मध्य रेल्वेच्या सूत्रांनी दिली. एकूण १८४. ९४ किलोमीटर अंतराच्या तिसऱ्या रेल्वे लाईनचा हा प्रकल्प १ हजार ३६० कोटी रुपयांचा आहे. या कामामध्ये सध्या ट्रॅकच्या कामासह एकाच वेळी विद्युतीकरणही प्रगतीपथावर आहे.

या रेल्वे लाईनमुळे रेल्वेचा प्रवास वेगवान होण्यास मदत होणार आहे. केवळ प्रवासी गाड्या एकाच ट्रॅकवर चालवून प्रवाशांचा वेळ वाचणार आहे. (53 percent work of third line of Manmad Jalgaon Bhusawal railway is complete news)

असा आहे प्रकल्प

* एकूण लांबी : १८३.९४ किमी

* काम पूर्ण : ९६.८१ किमी (५३ टक्के)

* एकूण किंमत : १ हजार ३६०.१६ कोटी

* आजपर्यंतचा खर्च : १ हजार २८६.७५ कोटी (९४ टक्के)

* एकूण भौतिक प्रगती : ८० टक्के

* जमीन संपादन पूर्ण : २८.१९/३७.०८ हेक्टर (७६ टक्के).

पूर्ण झालेले विभाग- ९६.८१ किमी (५३ टक्के)

भुसावळ- जळगाव

जळगाव- पाचोरा

मनमाड- नांदगाव

भाग पूर्ण होण्याच्या टप्प्यावर

(शक्यतो या वर्षात)

३१.७९ किमी (१७ टक्के)

चाळीसगाव-पिंपरखेड

Work in progress of third railway line
Jalgaon Municipality: मनपाच्या सुविधा, आवाहने आता सोशल मीडियावर!

प्रगतीपथावर आहे

५५.३४ किमी (३० टक्के)

पाचोरा - चाळीसगाव

नांदगाव - पिंपरखेड

पूर्ण झालेली कामे (कंसात टक्केवारी)

* अर्थ वर्क- ३४.१०/५९.९२ एल-सीयूएम (५७)

* ब्लँकेटिंग- १/७.४२ एल-सीयूएम

* प्रमुख पूल- ११/२२ (५०)

* छोटे पूल/आरयूबी- १४२/२९५ (४८.१३)

* स्टेशन इमारती- ७/१५ (४७)

* ट्रॅक लिंकिंग- ७०/१६० किमी (४३)

* गिट्टी पुरवठा- २.८७/५.०२ एल-सीयूएम (५७)

* ओएचई फाउंडेशन- ७७४/३१६८ (२४)

मास्ट इरेक्शन- ५१३/२४४३ (२१)

Work in progress of third railway line
Jalgaon News: फुलपाखरु प्रश्‍नमंजुषेस राज्यभरातून प्रतिसाद! अकराशेवर वन्यप्रेमींचा सहभाग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.