Jalgaon NMU News : 54 हजार विद्यार्थ्यांची गुणपत्रकं DigiLocker वर

NMU Jalgaon News
NMU Jalgaon Newsesakal
Updated on

Jalgaon News : तुम्ही मुलाखतीसाठी किंवा एखादा फॉर्म भरण्यास गेला आणि तुमचे गुणपत्रक नसेल, तरी आता घाबरण्याचे कारण नाही, ‘डिजीलॉकर’ या संकेत स्थळावरून हे गुणपत्रक तुम्हाला जगात कुठेही डाऊनलोड करता येणार आहेत.

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने ५४ हजार २२२ विद्यार्थ्यांची डिसेंबर २०२२ परीक्षेची गुणपत्रके डिजीलॉकरवर अपलोड करण्याची कार्यवाही पूर्ण केली आहे.

आजपर्यंतच्या आकडेवारीत ही संख्या महाराष्ट्र राज्य अकृषी विद्यापीठांमध्ये सर्वोच्च ठरली आहे.(54 thousand students Marksheet on DigiLocker website can be downloaded from anywhere in world Jalgaon News)

विद्यापीठाने डिजीलॉकरवर अपलोड केलेल्या डिसेंबर २०२२च्या बी. ए., बी. कॉम., बी. एस्सी., बीसीए प्रथम वर्ष आणि बी. टेक. पदवीसह एम. ए., एम. कॉम., एम. एस्सी., एमबीए, एमसीए या पदव्युत्तर अभ्यासक्रमांतील परीक्षा निकाल जाहिर केलेल्या १ लाख १७ हजार विद्यार्थ्यांच्या गुणपत्रकांपैकी ५४ हजार २२२ विद्यार्थ्यांचे ॲकॅडेमीक बँक ऑफ क्रेडीटचा एबीसी आयडी व विद्यार्थ्यांने दिलेला आधार जुळत असल्याने या विद्यार्थ्यांचे क्रेडीट ट्रान्सफर झाले आहेत.

उर्वरित ६२ हजार ७७८ विद्यार्थ्यांनी nmuj.digitaluniversity.ac या विद्यापीठाच्या संकेतस्थळावर ई-सुविधा, स्टुडंट प्रोफाईलमध्ये लॉगीन करुन एबीसी आयडीद्वारे आधारकार्ड नंबर अपडेट करावा.

जेणेकरुन त्यांचीही गुणपत्रके डीजीलॉकरमध्य (www.digilocker.gov.in) दिसू शकतील. एमकेसीएलचे अमोल पाटील यांनी ही कार्यवाही परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्र. संचालक यांच्या निर्देशान्वये केली आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

NMU Jalgaon News
New Parliament Inauguration:सेंगोल समोर मोदींचे दंडवत, संसदेत केली प्रतिष्ठापना

डिजीलॉकरचा फायदा

विद्यार्थ्यांजवळ गुणपत्रक नसले, तरीही त्यांना जगात कुठेही राहून गुणपत्रक डिजीलॉकरच्या संकेतस्थळावरुन डाऊनलोड करता येईल. ही गुणपत्रके कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने रितसर अपलोड केलेली असल्याने ती वैध गुणपत्रके मानली जातील.

अडचणीच्या वेळी विद्यार्थ्यांना नोकरी, मुलाखत किंवा इतर महत्वाच्या कामांसाठी या सुविधेचा तत्पर लाभ घेता येईल.

याबाबत विद्यापीठाने २८ फेब्रुवारी २०२३ च्या परिपत्रकाद्वारे विद्यार्थी व महाविद्यालयांना कळविलेले आले आहे. विद्यार्थी व महाविद्यालयांनी डिजीलॉकर संबंधातील विद्यार्थ्यांची माहिती अपलोड करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

NMU Jalgaon News
Jalgaon Accident News : सुसाट ट्रकच्या धडकेत पतीचा मृत्यू ,पत्नी गंभीर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()