जळगाव : मोरगाव (ता. रावेर) येथे मध्य प्रदेशासह मुक्ताईनगर व रावेर तालुक्यांतील जुगाऱ्यांचा मोठा डाव बसला होता. (55 lakh loot seized in raid on gambling den in Morgaon jalgaon crime news)
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सोमवारी (ता. ६) पहाटे चारला छापा (Raid) टाकून सुमारे ५५ लाख ४६ हजारांच्या ऐवजसह १७ जुगाऱ्यांना अटक केली. याबाबत रावेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
मोरगावला जुगारअड्डा सुरू असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक किशन नजन पाटील यांना मिळाली. त्यावरून उपनिरीक्षक अमोल देवढे, बाळासाहेब नवले, सहाय्यक फौजदार रवी नरवाडे, युनूस शेख इब्राहिम, कमलाकर बागूल, महेश महाजन, संतोष मायकल, किरण धनगर, श्रीकृष्ण देशमुख, भारत पाटील, प्रमोद ठाकूर, समाधान ठाकूर, विशाल पाटील,
प्रमोद पाटील, सचिन घुगे यांनी सद्गुरू बैठक सभागृहाशेजारील प्रल्हाद पाटील यांच्या घराच्या वॉलकंपाउंडमध्ये सुरू असलेल्या जुगारअड्ड्यावर छापा टाकला. त्यामुळे जुगाऱ्यांची तारांबळ उडाली. काहींनी पळण्याचा प्रयत्नही केला. त्यामुळे पोलिसांनी काहींना पाठलाग करून, तर काहींना जागेवरच पकडले.
हेही वाचा : तुमच्याकडं कागदी स्वरुपातले शेअर आहेत? मग हे वाचाच....
संदीप दिनकरराव देशमुख (वय ४८, रा. पुर्नाड, ता. मुक्ताईनगर), संजय दर्शन गुप्ता, शांताराम जीवराम मंगळकर (लालबाग, मध्य प्रदेश), समाधान काशीनाथ कोळी (सांगवा, ता. रावेर), कासम महेबूब तडवी (पिंप्री, ता. रावेर), जितेंद्र सुभाष पाटील (विवरा, ता. रावेर), कैलास नारायण भोई (भोईवाडा, ता. रावेर),
मनोज दत्तू पाटील (पिंप्री, ता. मुक्ताईनगर), मनोज अनाराम सोळंखे (आलमगंज, बऱ्हाणपूर), सुधीर गोपालदास तुलसानी (बऱ्हाणपूर), रवींद्र काशीनाथ महाजन (वाघोदा, ता. रावेर), बापू मका ठेलारी (पुर्नाड), राजू सुकदेव काळे (बऱ्हाणपूर), युवराज चिंधू ठाकरे (रावेर), सोपान एकनाथ महाजन (बऱ्हाणपूर), जागामालक प्रल्हाद पाटील (पुर्नाड) यांच्यासह इतरांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
दीड लाखाची रोकड
पोलिसांना जुगाराच्या डावात एक लाख ४६ हजार ९४० रुपये आढळून आले. सोबतच आठ लक्झरियस कार, सहा दुचाकी असा ५५ लाख ४६ हजार ९४० रुपयांचा ऐवज पोलिसांनी पंचनामा करून ताब्यात घेतला आहे.
‘ग्रीनबेल्ट’चे जुगारअड्डे फेमस
मुक्ताईनगर तालुक्यातील अंतुर्ली, कोथळी, बेलसावडी, रावेर तालुक्यांतील अहिरवाडी, वाघोदा, भोकरी, रसलपूर यांच्यासह तालुक्यातील मोठ्या गावात सधन शेतकरी असून, हा सर्व परिसर ‘ग्रीनबेल्ट’ म्हणून ओळखला जातो.
सातपुडा पर्वत आणि त्यापलीकडे मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर जवळ असल्याने मोठ्या प्रमाणावर अवैध धंदे चालविले जातात. गुटखा, गावठी पिस्तुले, गांजा, अवैध दारूची विक्रीही होते. चक्क नोटांचे पोते घेऊन जुगारी जुगार खेळायला बसतात. आखाजी, होळीच्या दिवशी जुगाऱ्यांसाठी खास व्यवस्था केली जात असल्याचे सांगण्यात येते.
दारू, सिगारेट दिमतीला
रावेर, मुक्ताईनगर तालुक्यातील जुगारअड्ड्यांवर दारू, बिअर, गुटखा, सिगारेटसह नशेच्या वस्तू जागच्या जागी पुरविल्या जातात. यामुळे जुगारअड्ड्यांची प्रचंड क्रेज आहे. दोन दिवसांपूर्वीच माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी अधिवेशनात अवैध धंद्यांचा भांडाफोड केला हेाता. त्या अनुषंगाने ही कारवाई झाल्याचीही चर्चा आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.