Jalgaon News : जिल्ह्यात यंदा झालेला ८५ टक्के पाऊस, त्यातही पावसाची दीर्घकाळ विश्रांती यामुळे खरिपाच्या पिकांचे उत्पादन घटले आहे. राज्य शासनाने चाळीसगाव तालुका दुष्काळी जाहीर केला असला तरी इतर तीन तालुकेही दुष्काळाच्या छायेत आहे.
एकूण ५६० गावे दुष्काळाच्या गर्तेत असून जिल्हा प्रशासनाने टंचाई आराखडा तयार करण्याच्या कामास वेग घेतला आहे. (560 villages in drought including 4 district jalgaon news)
जी गावे शासनाच्या लिस्टवर दुष्काळात नाहीत, तेथे काय सुविधा देता येतील, यासाठी राज्यस्तरावर पाठपुरावा सुरू करण्यात आला आहे.
जळगाव जिल्ह्यात ‘अल निनोमुळे’ यंदा जूनच्या शेवटी पाऊस सुरू झाला. जुलैत पेरण्या योग्य पाऊस झाला. जुलैच्या शेवटच्या आठवड्यापासून ते ऑगस्टमध्ये तब्बल दीड महिना पावसाने दडी मारली.
सप्टेंबरमध्ये परतीचा पाऊस चांगला झाल्याने खरिपाला जीवदान मिळाले. पाऊस कालावधीत जळगाव जिल्ह्यात अवघा ८८ टक्के पाऊस झाला. त्यामुळे गिरणा पट्ट्यातील तालुक्यांमध्ये आजही पिण्याच्या पाण्याची टंचाई कायम आहे.
पाणी पातळीत घट
जिल्हा प्रशासनाकडून पाणीटंचाई असलेल्या गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. वरिष्ठ भूवैज्ञानिक विभागाकडूनही जिल्ह्यातील भूजल पातळीचे निरीक्षण करण्यात आले. यात चाळीसगाव तालुक्यातील भूजल पातळी ही दीड मीटरने घटल्याचा अहवाल देण्यात आला होता.
दुष्काळाची परिस्थितीत दर्शविणारी सुधारित पैसेवारी जिल्हा प्रशासनाकडून जाहीर करण्यात आली. यात जिल्ह्यातील चार तालुक्यातील ५६० गावांची पैसेवारी ही ५० पैशांच्या आत असल्याने ही गावे दुष्काळाच्या छायेत असल्याचे मानले जात आहे.
अंतिम पैसेवारीनंतर परिस्थिती स्पष्ट
जिल्हा प्रशासनाकडून दुष्काळाच्या परिस्थितीचा अंदाज घेण्यासाठी नजर, सुधारित, अंतिम पैसेवारी जाहीर केली जाते. १५ सप्टेंबरला नजर पैसेवारी जाहीर करण्यात आली होती. त्यात चाळीसगाव तालुक्यातील १३७ गावांची पैसेवारी ही ५० पैशांच्या आत होती. आता ३१ ऑक्टोबरला प्रशासनाकडून सुधारित पैसेवारी जाहीर करण्यात आली आहे.
यात यंदा तब्बल ५६० गावे ही दुष्काळाच्या छायेत आहेत. जिल्ह्यातील ९४३ गावांची पैसेवारी पन्नास पैशांच्या वर असल्याने ही गावे दुष्काळापासून सध्यातरी दूर आहेत. ३१ डिसेंबरला अंतिम पैसेवारी जाहीर झाल्यानंतर राज्य शासनाकडून दुष्काळाची परिस्थिती स्पष्ट होणार आहे.
दुष्काळाच्या छायेतील गावे
तालुका--गावे
जामनेर-१५३
अमळनेर- १५४
चोपडा-- ११६
चाळीसगाव--१३७
एकूण- ५६० गाव
''जिल्ह्यातील ५६० गावे दुष्काळाच्या छायेत आहे. जिल्हा प्रशासन योग्य त्या उपाययोजना करीत आहे. पाण्याचे टँकर लागलीच सुरू करण्यात आहेत. शासनाकडून तूर्त चाळीसगाव तालुका दुष्काळी जाहीर झाला आहे. इतर तीन तालुक्यांतील दुष्काळाबाबत अभ्यास सुरू आहे.''- आयुष प्रसाद, जिल्हाधिकारी
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.