Jalgaon Accident News : जिल्ह्यात जानेवारी ते डिसेंबर २०२२ यादरम्यान एकूण ८४३ रस्ते अपघात झाले. त्यात एकूण ५६४ व्यक्तींचा मृत्यू झाला, तर ७१९ जण जखमी झाल्याचे (Jalgaon News) विदारक चित्र समोर आले आहे. यावरून वाहनधारक किती बेदारकपणे व निष्काळजीपणे वाहने चालवितात, हे स्पष्ट होते. (564 people died in 843 road accidents in jalgaon accident news)
उपप्रादेशिक परिवहन कार्यालय विभागाने (आरटीओ) वर्षभरातील कामाबाबत माहिती दिली. ‘आरटीओ’च्या वायुवेग पथकाद्वारे २०२२-२३ या कालावधीत करण्यात आलेल्या दंडात्मक कारवाईत कार्यालयाच्या इतिहासात प्रथमच सात कोटींपेक्षा जास्त दंड वसुली झाली.
वर्षात एकूण सात कोटी ३५ लाख ४० हजार रुपयांची दंडवसुली झाली. एक कोटी ३८ लाख रुपये करवसुली झाली. शासनाने दिलेल्या लक्षांकाच्या १०६ टक्के कामगिरी असल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही यांनी दिली.
जानेवारी ते मार्च २०२२ च्या तुलनेत जानेवारी ते मार्च २०२३ या कालावधीत एकूण अपघातांच्या संख्येत १६ टक्क्यांनी घट झाली. अपघाती मृत व्यक्तींच्या संख्येत १५ टक्क्यांनी घट झाली आहे.
दहा हजार वाहनचालकांना दंड
विनापरवाना चालविणाऱ्या दोन हजार १३५, परवाना नसलेल्या ३९४, योग्यता प्रमाणपत्र नसलेल्या तीन हजार ५५८, पीयूसी नसलेल्या दोन हजार ९९९, अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या ८९८, अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या १६५ लक्झरी बस, अशा एकूण दहा हजार १४९ वाहनांविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यात आली.
हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत
दोषी चालकांविरुद्ध कारवाई
पथकाच्या कारवाई अंतर्गत दुचाकी चालविताना हेल्मेट परिधान न करणे चार हजार ४७१, सीटबेल्ट न वापरणे एक हजार १२५, वाहन चालविताना मोबाईलचा वापर ७२२, विमा प्रमाणपत्र नसणाऱ्या तीन हजार ३३५, अतिवेगाने वाहन चालविणाऱ्या एक हजार १९२, मालवाहू वाहनातून प्रवासी वाहतूक करणाऱ्या १७०, मालवाहू वाहनातून जादा भार करणाऱ्या ८७८ व लाल परावर्तक नसणाऱ्या दोन हजार २८०,
टपावरून मालाची वाहतूक करणाऱ्या लक्झरी बस १३, अशा एकूण १४ हजार १८६ वाहनावर दंडात्मक कारवाई करण्यात आली. दोषी वाहनचालकाविरुद्ध मोटार वाहन निरीक्षक आर. डी. निमसे, श्रीकांत महाजन, सुनील गुरव, धीरज पवार, दीपक ठाकूर, संदीप पाटील, हेमंत सोनवणे, चंद्रविलास जमदाडे, नितीन सूर्यवंशी, नितीन सावंत, सौरभ पाटील, प्रशांत कंकरेज, अविनाश दुसाने, गणेश पिंगळे, जगदीश गुगे, विनोद चौधरी, सुनील ठाकूर, नितीन जठार यांनी कारवाई केली.
"आरटीओ विभागाला १७५ कोटी महसूल वसुलीचे उद्दिष्ट दिले होते. त्यापैकी एकूण १६० कोटी ९८ लाखांची वसुली झाली. ते लक्षांकाच्या ९२ टक्के आहे. ५६ हजार ३२३ इतक्या नवीन वाहनांची नोंदणी झाली. इलेक्ट्रिक वाहनांच्या नोंदणीमध्ये दुचाकी वाहनांच्या नोंदीत ३५३ टक्क्यांनी वाढ झाली आहे." -श्याम लोही, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, जळगाव
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.