Jalgaon Water Scarcity : जिल्ह्यातील 592 गावांना पाणीटंचाईची झळ; 10 कोटींचा आराखडा तयार

water scarcity
water scarcity esakal
Updated on

Jalgaon Water Scarcity : जिल्ह्यात यंदा केवळ ८८.८ टक्के पाऊस झाला आहे. तब्बल बारा टक्के पाऊस कमी झाला आहे. यामुळे जिल्ह्यात संभाव्य ५९२ गावांमध्ये पाणीटंचाई जाणवेल असा प्राथमिक अंदाज जिल्हा प्रशासनाने वर्तविला आहे.

त्यासाठी ९ कोटी ९० लाख रुपयांचा टंचाई कृती आराखडा जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी मंजूर केला आहे. लवकरच हा आराखडा शासनाला सादर केला जाईल. २०२३-२४ साठी जिल्ह्यातील संभाव्य पाणीटंचाई कृती आराखडा जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागामार्फत तयार करण्यात आला. (592 villages in district faces water shortage jalgaon news)

यात जिल्ह्यात आगामी काळात ५९२ गावांमध्ये संभाव्य पाणीटंचाई जाणवणार असल्याची शक्यता असून उपाययोजना राबविण्यासाठी ९ कोटी ९० लाख ७४ हजार रुपयांचा खर्च लागणार आहे. हा आराखडा जिल्हाधिकाऱ्‍यांना सादर करण्यात आला होता. यास जिल्हाधिकारी यांनी मंजुरी दिली आहे.

चाळीसगावात टँकर सुरूच

जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यात पावसाळा संपूनही पाणीटंचाईची परिस्थिती कायम आहे. त्यामुळे चाळीसगाव तालुक्यातील १३ गावांमध्ये १४ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.

संभाव्य पाणीटंचाईची गावे

तालुका गावे

जळगाव २१

जामनेर ६९

मुक्ताईनगर २०

पाचोरा २५

अमळनेर १०९

भडगाव १७

water scarcity
CM Eknath Shinde : महर्षी वाल्मीकी महामंडळ‌ स्थापनेबाबत सकारात्मक प्रयत्न : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

भुसावळ ९

बोदवड १२

चाळीसगाव ५७

चोपडा ८७

धरणगाव ३१

एरंडोल २८

पारोळा ८५

रावेर ९

यावल १३

एकूण ५९२

water scarcity
Special Train : अमरावती- पुणे, बडनेरा- नाशिकदरम्यान रेल्वेच्या उत्सव विशेष ट्रेन चालविणार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.