जळगाव : खरीप हंगामात जिल्ह्यात खतपुरवठा सुरळीत सुरु आहे. एप्रिल, मेत आवश्यकतेप्रमाणे कंपन्यांमार्फत खत पुरवठा करण्यात आलेला आहे. युरियाचा ६० हजार ९१० मेट्रीक टन साठा विक्रीसाठी उपलब्ध आहे. डीएपी खताचा ६ हजार ४९३ मेट्रीक टन एमओपी खताचा ८ हजार ५४४ मेट्रीक टन एनपीके संयुक्त खतांचा २८ हजार ६९० मेट्रीक टन व एसएसपी खताचा ४७ हजार ११९ साठा विक्रीसाठी उपलब्ध आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाचे कृषी विकास अधिकारी वैभव शिंदे यांनी दिली.
मेच्या अखेरीस व खरीप हंगामाच्या सुरवातीस युरीयासह इतर खतांचा पुरवठा मुबलक प्रमाणात झालेला आहे. त्यामुळे जिल्ह्यात पुरेशा प्रमाणात सर्व खते उपलब्ध असून दरमहा खतांच्या उपलब्धतेचे नियोजन केलेले आहे. त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता जादाची खते भरून ठेवू नये.
जादा दराने खरेदी करू नये
खताच्या बॅगवर निर्धारित दरापेक्षा जास्त दराने खते खरेदी करु नये. जादा दराने खत विक्री होत असल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित तालुका कृषी अधिकारी किंवा कृषी अधिकारी, पंचायत समिती यांच्याकडे त्वरित तक्रार करावी. एकाच वेळी जास्त खत खरेदी करून साठा करून ठेवू नये, सर्व खते उपलब्ध असल्याने जसे लागेल तसेच खत उचल करावी. खत खरेदी पक्क्या बिलाने व अधिकृत दुकानातूनच करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
''शेतकरी बांधवांनी फक्त युरिया खताचा वापर न करता इतर उपलब्ध सरळ, मिश्र, संयुक्त खतांचा वापर संतुलित प्रमाणात करावा. जमिनीचे आरोग्य व पर्यायाने स्वत:चे आरोग्य देखील सांभाळावे व खर्चात बचत करावी. कृत्रिम खत टंचाईवर नियंत्रणासाठी जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय भरारी पथकांमार्फत तपासणी सुरु आहे.'' - वैभव शिंदे, कृषी विकास अधिकारी.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.