Jalgaon Fraud Crime : ग्राहक सेवा केंद्र चालकाची फसवणूक; भामट्याविरुद्ध पारोळ्यात गुन्हा दाखल

 fraud
fraud sakal
Updated on

Jalgaon Fraud Crime : जिराळी (ता. पारोळा) येथील रहिवासी व सध्या पारोळा येथे विश्‍वकर्मा ऑनलाईन सर्विस सेंटर या ग्राहक सेवा केंद्राचे संचालक सोपान मिस्तरी यांची धुळे येथील एका युवकाने ऑनलाइन ट्रांजेक्शनच्या नावाखाली तब्बल ६३ हजार पाचशे रुपयांची फसवणूक केली. या प्रकरणी पारोळा पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. (63 thousand rupees fraud by youth in name of online transaction jalgaon fraud crime news)

गेल्या १८ ऑगस्टला मिस्तरी हे नेहमीप्रमाणे ग्राहक सेवा केंद्रात काम करीत होते. त्यावेळी धुळे येथील वैभव शरद सोनवणे हा तेथे आला. त्याने सांगितले की, आपण एका फर्टीलायझर कंपनीत एजंट असून, पारोळा, भडगाव, पाचोरा, अंमळनेर, कासोदा या भागात व्यवसायानिमित्त येणे जाणे असते. कंपनीच्या कामानिमित्त पैसे जमा करून ते कंपनीच्या खात्यावर पाठवीत असतो.

यापुढे आपल्याकडून नेहमीच व्यवहार करेन व त्यासाठी आपणास योग्य ते कमिशनदेखील देईल, असे सांगून तो निघून गेला. दुसऱ्या दिवशी (ता. १९) त्याने २३ हजार ५०० रूपये कंपनीला पाठवायचे असल्याचे सांगत अकाउंट नंबरऐवजी फोन पे नंबर दिला. काही वेळाने गुगल पेद्वारे कमिशनसह २४ हजार रुपये ग्राहक केंद्र चालकास परत दिले आणि याचप्रमाणे व्यवहार करण्यास सांगितले.

त्यानंतर त्याने आनंद फुलपगारे यांचा फोन पे नंबर देत ४० हजार ५०० रूपये पाठविण्यास सांगितले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

 fraud
Jalgaon Fraud Crime : बनावट बिलांद्वारे सरकारची 26 कोटींत फसवणूक

त्यानुसार मिस्तरी यांनी २० हजार ५०० रूपये व २० हजार रूपये असे दोनवेळा एकुण ४० हजार ५०० रूपये पाठविले. त्यानंतर ऋषभ पाटील यांच्या नावे २३ हजार पाठवायला लावले. त्यानुसार मिस्तरी यांनी एकूण ६३ हजार ५०० रुपये वैभवच्या सांगण्यावरून ऑनलाईन ट्रान्सफर केले.

त्यानंतर वारंवार मागणी करूनही सदर रक्कम परत मिळत नसल्याने व वैभव हा उडवाउडवीचे उत्तर देत असल्याचे निदर्शनास आल्याने आपली फसवणूक झाल्याचे मिस्तरी यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी मंगळवारी (ता. २९) वैभव सोनवणेविरुद्ध पारोळा पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला असून, नाना पवार तपास करीत आहेत.

दरम्यान, धुळे येथील वैभव सोनवणे याने अन्य तालुक्यांतदेखील याप्रमाणे ऑनलाइन टँझेक्शनद्वारे फसवणूक केली असल्याचे पोलीस ठाण्याच्या आवारात बोलले जात होते.

 fraud
Online Fraud : परदेशात नोकरीचे आमिष; १२ लाखांना लुबाडले

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.