Jalgaon News : पोलिसाच्या पित्याची आत्महत्या; मेहरुण तलावात तरंगतांना आढळला मृतदेह

Volunteers of wildlife organization removing dead bodies from the lake.
Volunteers of wildlife organization removing dead bodies from the lake.esakal
Updated on

जळगाव : औद्योगिक वसाहत परिसरातील जगवानीनगरात वास्तव्यास असलेल्या ६३ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचा मेहरूण तलावात बुडून (Drowning) मृत्यू झाला.

ही घटना गुरुवारी (ता. २) सकाळी सातच्या सुमारास उघडकीस आली. (63 year old senior citizen dies after drowning in Mehrun Lake jalgaon news)

बबन नामदेव पवार (रा. जुनी वसाहत, जगवानीनगर) असे मृत वृद्धाचे नाव आहे. बबन पवार पोलिस कर्मचारी असलेला मुलगा व सून यांच्यासोबत जगवानीनगरात वास्तव्याला होते. बबन पवार बुधवारी (ता. १) काही एक न सांगता सायंकाळी घरातून बाहेर गेले.

रात्रभर ते घरी परतले नाहीत. गुरुवारी सकाळी सातच्या सुमारास मेहरूण तलावात पोहण्यासाठी गेलेल्या काही वन्यजीव पथकातील सदस्यांना वृद्धाचा मृतदेह पाण्यात तरंगतांना आढळून आला. पथकातील राजेश सोनवणे, रवींद्र भोई, अजीब काझी यांनी पोहणाऱ्यांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढला.

हेही वाचा : बँक खात्याला जोडलेल्या सिमकार्डबाबत बाळगा ही काळजी...

Volunteers of wildlife organization removing dead bodies from the lake.
Eknath Khadse : रेमंडमधील टाळेबंदीची ‘धग’ विधिमंडळापर्यंत; एकथान खडसेंनी मांडली लक्षवेधी

एमआयडीसी ठाण्याचे पोलिस कर्मचारी समाधान टहाकळे आणि विकास सातदिवे यांनी पंचनामा केला. पाण्यात कोणत्या कारणाने बुडाले याबाबत माहिती कळू शकली नाही. जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मृतदेह रवाना करण्यात आला.

त्यांच्या खिशातील कागदपत्रांवरून यांची ओळखी पटली. बबन पवार असे नाव निष्पन्न झाल्यानंतर त्याचा मुलगा पोलिस कर्मचारी विकास पवार यांना घटना कळविण्यात आली. याबाबत एमआयडीसी पोलिस ठाण्यात आकस्किमक मृत्यूची नोंद झाली आहे. पोलिस नाईक समाधान टाहकळे तपास करीत आहे.

Volunteers of wildlife organization removing dead bodies from the lake.
Board Exam : माय मराठीला सर्रास कॉपी, कारवाई शून्‍य; कॉपीमुक्त अभियानाचा दावा फोल!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.