Jalgaon News : ‘व्हॅलेंटाइन डे’ अर्थात प्रेम दिन साजरा करण्यासाठी जळगाव शहरातील तरुणाई सज्ज झाली होती. अनेकांनी आपल्या प्रिय मित्र, मैत्रिणीला या दिवसाचे गिफ्ट, शुभेच्छा पत्रे देवून प्रेम वक्त केले.
आजच्या दिवशी लग्न केले म्हणजे आयुष्यभर लग्नाचा वाढ दिवस स्मरणात राहील, या उद्देशाने अनेक प्रेमी युगुल विवाह बद्ध होतात. मात्र आज केवळ सहा जोडप्यांनी विवाह नोंदणी कार्यालयात जाऊन विवाह बद्ध झाले. (7 lover couple got married at jalgaon collector office on valentines day 2024 news)
‘व्हॅलेंटाइन डे’ पाश्चिमात्य संस्कृती असल्याने भारतात अनेक संघटनांचा या डे’ला विरोध असतो. ‘व्हॅलेंटाइन डे’ साजरे करणाऱ्या युगलांना संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी चोप दिल्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत.
यामुळे सावधगिरी बाळगत जिल्ह्यात सात युगलांनी आज सकाळीच जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन विवाह बद्ध होत काढता पाय घेतला. गतवर्षी ‘व्हॅलेंटाइन डे’ ला प्रेमी युगलांनी विवाह बद्ध होण्यास गर्दी केली होती. त्यांचे छायाचित्र घेण्यास अनेकांनी गर्दी केली.
यामुळे ते प्रेमी युगुल विवाह बद्ध न होताच पसार झाली होती. घरच्यांचा विरोध पत्करून अनेकांनी प्रेम विवाह, त्यात जर प्रसाद माध्यमात फोटेा आला तर अनेक अडचणींचा सामना करायला नको म्हणून चार हात फोटोपासूनच दूर राहिलेलेच बरे, अशी पध्दत अवलंबिली गेली.
शहरातील बगीचे, मेहरूणचे उद्यान, तलावा काठचा परिसर, कोल्हे हिल्सकडील परिसर अशा शांततेच्या ठिकाणी प्रेमी युगल नेहमी असतात.
मात्र आज ‘व्हॅलेंटाइन डे’ ला या युगलांनी या परिसरात न जाता, शहरातील विविध हॉटेल्सचा, पिझ्झा बर्गर, काफी शाप, शीतपेयांची दुकानांत जाउन हा डे साजरा केल्याचे चित्र होते.
‘व्हॅलेंटाइन डे’ विविध प्रकारची गिफ्ट, ‘आय लव्ह यू’ बोलणारा ‘टेडी’, लाइट मिरर फ्रेम, ‘हृदयाच्या आकारातील लव्ह’ यासह विविध प्रेम प्रसंग चितारलेली ग्रीटिंग कार्ड, भेट कार्ड, परफ्यूम आदी वस्तूं, गुलाबाची फुले यांना आज प्रचंड मागणी झाली.
"‘व्हॅलेंटाइन डे’ ला गतवर्षी सात विवाह जोडपी विवाह बद्ध झाली होती. यंदा केवळ सहा जोडपी विवाह बद्ध झाली. या दिवशी अनेक जण घरच्यांचा विरोध पत्करून विवाह करतात. त्याची वाच्यता लवकर व्हायला नको यासाठी ते प्रयत्नशील असतात. काही फोटोग्राफर फोटो काढतात या भीतीने अनेक संख्येने प्रेमीयुगल आज विवाह बद्ध झाले नाहीत." -संजय ठाकरे, दुय्यम निबंधक विवाह नोंदणी अधिकारी.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.