Jalgaon Leopard News : बिबट्याच्या बछड्याची पॉलिहाऊसमध्ये घुसखोरी; तिरपोळे शिवार भयभीत

A leopard calf in a polyhouse.
A leopard calf in a polyhouse. esakal
Updated on

Jalgaon Leopard News : तिरपोळे (ता. चाळीसगाव) शिवारातील एका शेतातील पॉलिहाऊसमध्ये बिबट्याचे सात ते ८ महिने वयाचे बछडे आढळून आल्याने एकच खळबळ उडाली.

बछडा आढळून आल्याने परिसरात मादी बिबटही असण्याची शक्यता असल्याने हे बछडे जवळच असल्याने तेथे उसाच्या शेतात सोडून देण्यात आले असून, वन विभाग याठिकाणी लक्ष ठेवून आहे. (7 to 8 month old leopard cubs were found in farm polyhouse in chalisgaon jalgaon news)

तिरपोळे शिवारात मेहुणबारे-वरखेडे रस्त्यावरील संजय विजयसिंग पाटील यांच्या शेतातील पॉलिहाऊसमध्ये बिबट्याचे सात ते आठ महिन्याचे बछडे आढळून आले. आज सकाळी नाना पाटील व योगेंद्रसिंग पाटील पॉलिहाऊसमध्ये सामान घेण्यासाठी गेले असता त्यांना रानमांजरासारखा प्राणी दृष्टीक्षेपास पडला.

त्यांनी जवळ जावून पाहिले असता तो बिबट्याचा बछडा असल्याने व त्याने डरकाळी फोडताच ते भांबावले. त्यांनी पॉलिहाऊसचा दरवाजा बंद करून शेतमालकाला ही माहिती दिली. या ठिकाणी योगेंद्र पाटील व नाना पाटील यांनी हे दोघे वन विभागाचे कर्मचारी येईपर्यंत या बछड्यावर लक्ष ठेवून होते.

नगराळे यांची तत्परता

बिबट्याचे बछडे आढळून आल्याने वन विभागाला माहिती दिली. सकाळी नऊच्या सुमारास जळगाव येथे जाण्यासाठी निघालेल्या वनपरिक्षेत्र अधिकारी शीतल नगराळे यांना कळताच त्यांनी बहाळ गावापासून वाहन फिरवत घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

A leopard calf in a polyhouse.
Leopard : आजीसाठी 'ती' बिबट्याशी भिडली! 10 वर्षाच्या नातीनं 60 वर्षाच्या आजीला वाचवलं; मध्यरात्री घडला थरार

मात्र या बछड्यासमवेत त्याची आई मादी बिबट देखील आसपास असण्याचा संभव असल्याने व हा बछडा लहान असल्याने त्याला पॉलिहाऊसमधून बाहेर काढण्यासाठी तब्बल दीड तास प्रयत्न केला.

त्याचवेळी हा बछडा पॉलिहाऊसच्या एका कोपऱ्यातून बाहेर पडून जवळच्या उसात धूम ठोकली. त्यामुळे शेतकऱ्यांनी सुटकेचा नि:श्‍वास सोडला. घटनास्थळी मेहुणबारे पोलिस ठाण्याचे कर्मचारी, वन विभागाच्या कर्मचाऱ्यांसह ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती.

सोडून दिल्याने रोष

पॉलिहाऊसमध्ये घुसलेल्या बछड्याला सोडून देण्यात आल्याने ग्रामस्थांनी रोष व्यक्त केला. या बछड्याला पकडून सुरक्षित अधिवासात न्यावे, असे ग्रामस्थांचे म्हणणे होते. मात्र वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधून वस्तुस्थिती सांगितली.

A leopard calf in a polyhouse.
Leopard Yoga : चक्क बिबट्याने केले सूर्यनमस्कार, IFS अधिकाऱ्याने शेअर केलेला व्हिडिओ होतोय व्हायरल

हे बछडे लहान असल्याने तिची आई आसपास असल्याचा अंदाज व्यक्त करत या बछड्याला सोडणे गरजेचे होते. अन्यथा मादी बिबटकडून हल्ला होण्याची शक्यता असल्याचे ग्रामस्थांना पटवून दिले.

बिबट्याला पोषक वातावरण

दरम्यान, गेल्यावर्षी मेहुणबारेलगतच्या शिदवाडी शिवारात उसतोड सुरू असताना मजुरांना नुकतेच जन्मलेले बिबट्याचे बछडे आढळून आले होते. वन विभागाने या ठिकाणी ट्रॅप कॅमेरे लावले होते. आता पुन्हा गिरणा पट्ट्यात बिबट्याचे बछडे आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. गिरणा पट्टयात गेल्या सात, आठ वर्षांपासून बिबट्याचा रहिवास आहे.

आठ वर्षांपूर्वी वरखेडे शिवारात नरभक्षक झालेल्या बिबट्याने शेकडो पशुधन फस्त करण्यासह आठ मानवी बळी घेतले होते. त्यामुळे परिसरातील जनजीवन भयभीत झाले होते. त्यानंतर या नरभक्षक बिबट्याला गोळ्या घालून ठार मारले होते. मात्र त्यानंतरही या भागात असंख्य वेळा बिबट्याचे दर्शन घडून आले असून, अनेक पशुधनांवर हल्ल्ल्याच्या घटना घडल्या आहेत. बिबट्याच्या वास्तव्यासाठी हा परिसर पोषक असल्याचे सांगण्यात येते.

A leopard calf in a polyhouse.
Neerja Set Leopard News: मायरा वैकुळच्या हिंदी मालिकेच्या सेटवर बिबट्या घुसला, सेटवर घबराट

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.