Jalgaon Railway News : आषाढीनिमित्त 76 विशेष रेल्वेगाड्या; मध्य रेल्वेची 23 जून ते 3 जुलैदरम्यान सेवा

Railway News
Railway Newsesakal
Updated on

Jalgaon News : आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला विठ्ठल-रखुमाईच्या दर्शनासाठी जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी मध्य रेल्वेकडून विशेष ७६ रेल्वेगाड्या सोडण्यात येणार आहेत. यंदा आषाढी एकादशी २९ जूनला येत आहे.

विठ्ठलाच्या दर्शनासाठी राज्यभरातून भाविक पंढरपूरला जात असतात. याच पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेकडून २३ जून ते ३ जुलै या कालावधीत रेल्वेच्या ७६ विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या विशेष रेल्वेचे वेळापत्रकही मध्य रेल्वेकडून प्रसिद्ध केले आहे.(76 special trains on occasion of Ashadhi Central Railway service from 23rd June to 3rd July Convenience of devotees Jalgaon News)

पंढरपूर आषाढी एकादशीनिमित्त रेल्वेच्या नागपूरहून मिरज, नागपूर-पंढरपूर यासह नवीन अमरावती-पंढरपूर, खामगाव-पंढरपूर, भुसावळ-पंढरपूर, लातूर-पंढरपूर, मिरज-पंढरपूर, मिरज-कुर्डूवाडी विशेष गाड्या चालवण्यात येणार आहेत. त्यामुळे लाखो भाविकांची सोय होणार आहे.

नागपूर - पंढरपूर स्पेशल : ही ट्रेन क्रमांक ०१२०७ नागपूरहून २६ आणि २९ जूनला सकाळी ८.५० वाजता सुटेल. दुसऱ्या दिवशी सकाळी आठला गाडी पंढरपूरला पोहोचेल.

परतीच्या प्रवासासाठी पंढरपूरहून १२०८ क्रमांकाची गाडी २७ आणि ३० जूनला सायंकाळी पाचला सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी १२.२५ ला नागपूरला पोहोचेल. या गाडीला एक सेकंड वातानुकूलित डब्यासह दोन तृतीय वातानुकूलित, १० स्लीपर क्लास आणि सात सामान्य द्वितीय श्रेणी यासह दोन लगेज कम गार्ड ब्रेक व्हॅन राहील.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Railway News
Jalgaon News : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी E-KYC करा

या स्थानकांवर थांबणार : अजनी, वर्धा, पुलगाव, धामणगाव, चांदूर रेल्वे, बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, जळगाव, चाळीसगाव, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, अहमदनगर, दौंड आणि कुर्डुवाडी या स्थानकांवर थांबेल.

नवीन अमरावती - पंढरपूर स्पेशल : अमरावती येथून गाडी क्रमांक ०१११९ २५ आणि २८ जूनला दुपारी २:४० वाजता पोहोचेल. दुसऱ्या दिवशी सकाळी ९:१० ला पंढरपूरला पोहोचेल.

परतीच्या प्रवासासाठी पंढरपूरहून गाडी क्रमांक ०११२० ही २६ व २९ जूनला रात्री ७.३० वाजता सुटून दुसऱ्या दिवशी दुपारी १२.४० ला अमरावती स्थानकात पोहोचेल. जी बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला, शेगाव, जलंब, नांदुरा, मलकापूर, बोदवड, भुसावळ, जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, नांदगाव, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, अहमदनगर, दौंड, कुर्डुवाडी स्थानकवार थांबेल. या ट्रेनला एक द्वितीय वातानुकूलित, दोन तृतीय वातानुकूलित, १० स्लीपर कोच, सात सामान्य द्वितीय श्रेणी किंवा दोन लगेज-कम-गार्ड ब्रेक व्हॅन असतील. या गाड्यांचा लाभ घेण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

Railway News
Jalgaon News : ‘महाजनको’ च्या संचालकपदी भुसावळचे हरणे; सर्वसामान्य कुटुंबातून प्राध्यापक ते संचालक अनोखा प्रवास

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.