Jalgaon News : अबब..! ‘गोलाणी’तून तब्बल 77 मेट्रिक टन कचरा संकलित; मनपाची विशेष स्वच्छता मोहीम

Jalgaon News : अबब..! ‘गोलाणी’तून तब्बल 77 मेट्रिक टन कचरा संकलित; मनपाची विशेष स्वच्छता मोहीम
Updated on

Jalgaon News : स्वच्छता पंधरवड्यांतर्गत रविवारी (ता. २४) महापालिकेच्या गोलाणी व्यापारी संकुलात दिवसभर स्वच्छता मोहीम राबवून ७७ मेट्रिक टन कचरा संकलित करण्यात आला. आणखी कचरा संकलित होत असून, त्याची मंगळवारी (ता. २६) विल्हेवाट लावण्यात येणार आहे.

महापालिका आयुक्त तथा प्रशासक विद्या गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली १८ अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली आरोग्य विभागाकडील मुख्य स्वच्छता निरीक्षक, आरोग्य निरीक्षक, युनिट प्रमुख व मुकादम यांच्या नेतृत्वात ही स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. तीनशेवर सफाई कर्मचारी यात सहभागी झाले. (77 metric tons of waste collected from Golani market jalgaon news)

गोलाणीत घाणीचे उकिरडे

गेल्या काही वर्षांपासून गोलाणी व्यापारी संकुलांत प्रत्येक मजल्यावर, प्रत्येक विंगमध्ये घाणीचे उकिरडे झाले होते. गाळेधारक सेवाशुल्क देत नसल्याने मनपाने त्याठिकाणचे सफाईचे काम बंद केले होते.

मात्र, या पंधरवड्याअंतर्गत रविवारी ही मोहीम राबविण्यात आले. तत्कालीन जिल्हाधिकारी तथा त्यावेळचे प्रभारी मनपा आयुक्त किशोर राजे निंबाळकर यांनी पुढाकार घेऊन पाच वर्षांपूर्वी या संकुलात स्वच्छता मोहीम राबविल्यानंतर आज पुन्हा हे अभियान राबविण्यात आले.

मार्केट, गच्चीवर सफाई

मार्केटची स्वच्छता मोहीम ही विंग क्रमांक १ ते ४ वर व आजूबाजूचा मार्केटचा परिसर, रस्ते साफसफाई या वेळी करण्यात आली. आयुक्त गायकवाड यांनी स्वतः हजर राहून मोहीम राबविली. सहाय्यक आयुक्त गणेश चाटे, सहआयुक्त (आरोग्य) उदय पाटील, शहर अभियंता चंद्रकांत सोनगिरे, सर्व मुख्य स्वच्छता निरीक्षक, आरोग्य निरीक्षक, उपस्थित होते.

Jalgaon News : अबब..! ‘गोलाणी’तून तब्बल 77 मेट्रिक टन कचरा संकलित; मनपाची विशेष स्वच्छता मोहीम
Jalgaon Fraud Doctor : अपत्यप्राप्तीच्या नावाने फसविणारी टोळी उघड; बनावट डॉक्टरसह चौघांचा समावेश

वाहनांच्या ३३ फेऱ्या

विशेष मोहीमद्वारे सदरील मार्केटमधील गोळा करण्यात आलेला कचरा एकूण ३३ ट्रीपच्या माध्यमातून वाहनांद्वारे वाहण्यात आला. त्याचे एकूण वजन ७७.८५ मेट्रिक टन इतके असून, अजूनही साफसफाईद्वारे मार्केटवरील गच्चीवर संकलित केलेला कचरा पडून आहे. त्याच्या विल्हेवाटीचे उर्वरित काम हे मंगळवारी मनपा प्रशासनाकडून करण्यात येणार असल्याचे सहआयुक्त उदय पाटील यांनी सांगितले.

आकडे दृष्टीक्षेपात..

आयुक्त/उपायुक्त : ०२

अधिकारी : १८

कर्मचारी : ३०५

वाहने : १७

वाहनांच्या फेऱ्या : ३३

कचरा संकलन : ७७ मेट्रिक टन

Jalgaon News : अबब..! ‘गोलाणी’तून तब्बल 77 मेट्रिक टन कचरा संकलित; मनपाची विशेष स्वच्छता मोहीम
Jalgaon Rain News : एरंडोल तालुक्यात पावसाचा हाहाकार; पिंपळकोठा, पिंप्रीसह 4 गावांत ढगफुटी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.