Jalgaon News : गुराख्यासह 8 जनावरे रेल्वेखाली चिरडून ठार; भीषण अपघाताने हादरला परिसर

Crowd at the accident
Crowd at the accident esakal
Updated on

मेहुणबारे (जि. जळगाव) : धुळ्याकडून चाळीसगावकडे येणाऱ्या मेमू रेल्वेगाडीखाली सापडून गुराख्यासह सात गायी व एक म्हैस चिरडून ठार झाल्याची घटना बुधवारी (ता. २९) दुपारी चाळीसगाव तालुक्यातील शिदवाडी गावाजवळ घडली. (8 animals including cow were crushed to death under train jalgaon news)

ही घटना इतकी विदारक आणि भीषण होती, की मृत जनावरांचे मांसाचे तुकडे रेल्वेरुळावर सर्वत्र विखुरले होते. चाळीसगाव-धुळे रेल्वे मेमू ट्रेन बुधवारी दुपारी धुळ्याहून चाळीसगावकडे येण्यास निघाली.

राजमाने स्थानक सोडल्यानंतर ही मेमू जामदा रेल्वेस्थानकाकडे येत असताना दुपारी चार वाजून दहा मिनिटांच्या सुमारास जामदा रेल्वेस्थानकाच्या अलीकडे शिदवाडी गावाजवळ खांबा क्रमांक ३४४ जवळ जनावरांचा कळप रेल्वेरुळावर आला.

त्याचवेळी मेमूचा वेग अधिक असल्याने गुराख्यासह ही जनावरे मेमू रेल्वेगाडीखाली सापडली. त्यात एकापाठोपाठ एक अशा सात गायी व एक म्हैस अशी आठ जनावरे चिरडून मृत्युमुखी पडली. एक पारडू जबर जखमी झाले. काही क्षणात होत्याचे नव्हते झाले.

नागरिकांची घटनास्थळी धाव

रेल्वेखाली जनावरे चिरडल्याने प्रवाशांमध्ये खळबळ उडून काही क्षण भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. घटना घडताच परिसरातील शेतकऱ्यांसह नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी गर्दी झाली होती.

हेही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??

Crowd at the accident
Jalgaon Accident News : कंटेनर टँकर अपघातात दोन्ही वाहनांचे चालक ठार; लाखो रुपयांची औषधी जळून खाक

घटना कशी घडली हे नेमके समजून आले नाही. मात्र रेल्वेच्या धडकेने तब्बल आठ जनावरे चिरडून ठार झाल्याने खळबळ उडाली आहे. ज्या ठिकाणी ही जनावरे रेल्वेच्या धडकेने ठार झाली, त्या रेल्वेरुळावर जनावरांच्या मांसाचा अक्षरश: खच पडला होता.

रेल्वेकडून घटनेचा पंचनामा

घटनेची माहिती मिळताच मेहुणबारे पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक प्रकाश चव्हाणके व सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, घटनेनंतर धुळे-चाळीसगाव मेमू सुमारे तासभर शिदवाडी येथेच थांबून होती. त्यानंतर ती जामदा रेल्वेस्थानकावर नेण्यात आली. दरम्यान, सायंकाळी रेल्वेकडून या घटनेचा पंचनामा करण्यात आला.

दिव्यांग राजेंद्रने गमावला जीव

ही घटना अंगावर शहारे आणणारी होती. शिदवाडी येथील प्रतापसिंग वजेसिंग जाधव यांची ही जनावरे होती. त्यांच्याकडे सालदार म्हणून राजेंद्र भीमराव सूर्यवंशी (वय ५०) जनावरे राखण्याचे काम करीत होते.

रेल्वेरुळावर जनावरे गेल्याने आणि समोरून रेल्वे येत असल्याने सूर्यवंशी जनावरे हाकण्यासाठी धडपड करीत असतानाच दुर्दैवाने तेही रेल्वेखाली सापडून त्यांचाही करुण अंत झाला. सूर्यवंशी एका हाताने दिव्यांग होते. ते ऊसतोडणीसाठी बाहेरगावी गेले होते व तेथून येऊन ते पुन्हा मूळ मालकाच्या शेतात कामासाठी आजपासून रुजू झाले होते. आज पहिल्याच दिवशी त्यांच्या मृत्यूने त्यांचा परिवार उघड्यावर पडला आहे.

Crowd at the accident
Jalgaon Crime: मशिदीबाहेर संगीत वाजवण्यावरून दोन गटात हाणामारी! ४ जखमी, ४५ जण ताब्यात

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.