Jalgaon : न्हावेच्या पीडित चव्हाण कुटुंबाला शासनाकडून 8 लाखांची मदत

MLA Mangeshiy handed over help to the families of the victims.
MLA Mangeshiy handed over help to the families of the victims.esakal
Updated on

चाळीसगाव : न्हावे (ता. चाळीसगाव) येथे गेल्या ९ सप्टेंबरला शेतात कपाशीला खत घालण्यासाठी चव्हाण कुटुंब गेले असता अंगावर वीज कोसळून पिता-पुत्र मृत्युमुखी पडले. या शेतकऱ्याच्या कुटुंबाला राज्य सरकारच्यावतीने आमदार मंगेश चव्हाण यांच्या हस्ते आठ लाख रुपये मदतीचा धनादेश देण्यात आला. (8 lakhs help from government to victim of lightning strike Chavan family jalgaon News)

MLA Mangeshiy handed over help to the families of the victims.
Jalgaon : शिरूड येथील 2 तरुणांचा सुरत येथे अपघाती मृत्यू

न्हावे येथील आबा शिवाजी चव्हाण व दीपक चव्हाण हे पिता-पुत्र वीज अंगावर कोसळून मृत्युमुखी पडले होते. त्यामुळे चव्हाण कुटुंबाला आधाराची गरज असून, राज्य सरकार व मी स्वतः व्यक्तिश: त्यांच्या पाठीशी आहे. शासनाच्या इतर योजनांचा लाभ या कुटुंबाला मिळवून देण्याच्या सूचना या वेळी प्रशासनाला केल्या असल्याची माहिती आमदार मंगेश चव्हाण यांनी दिली.

या प्रसंगी प्रांताधिकारी लक्ष्मीकांत साताळकर, तहसीलदार अमोल मोरे, भाजपचे तालुकाध्यक्ष प्रा.सुनील निकम, रिपाइंचे लोकसभा क्षेत्रप्रमुख आनंद खरात, तरवाडेचे पोलिस पाटील जीवन पाटील व उपसरपंच विलास पाटील, न्हावेचे पोलिस पाटील ओम शेलार, सुनील घोरसे आदी उपस्थित होते.

MLA Mangeshiy handed over help to the families of the victims.
Crime Update : विवाहितेवर अत्याचार करून व्हिडिओ व्हायरलची धमकी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.