Jalgaon News: धरणगावातील स्मृती स्थळांसाठी 9 कोटी मंजूर; पालकमंत्र्यांच्या प्रयत्नातून निधी

क्रांतीकारी ख्याजा नाईक स्मृती स्थळाकडे जाणारा रस्ता क्राॅंक्रिटीकरण व सुशोभीकरणासाठी २ कोटी असे एकूण ९ कोटींच्या कामांना पर्यटनमंत्री गिरीश महाजन यांनी भरीव निधीस मंजुरी दिली.
Gulabrao Patil
Gulabrao Patilesakal
Updated on

धरणगाव : येथील बालकवी ठोंबरे स्मारकासाठी पाच कोटी, साईसेवा समिती चॅरिटेबल ट्रस्ट यांचे पाळधी येथील साईबाबा मंदिर परिसरात भक्त निवास व सभागृह बांधकाम करण्यासाठी २ कोटी, हेडगेवार ग्रामपंचायत येथे क्रांतीकारी ख्याजा नाईक स्मृती स्थळाकडे जाणारा रस्ता क्राॅंक्रिटीकरण व सुशोभीकरणासाठी २ कोटी असे एकूण ९ कोटींच्या कामांना पर्यटनमंत्री गिरीश महाजन यांनी भरीव निधीस मंजुरी दिली. (9 crore sanctioned for memorial sites in Dharangaon Funding through efforts of Guardian Minister Jalgaon News)

याबाबत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी स्थानिक पातळीवर व मंत्रालयात वेळोवेळी बैठका घेऊन प्रश्न मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा केला होता.

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या मागणीनुसार मुख्यमंत्री शिंदे यांनी दौऱ्याप्रसंगी पाळधी व जळगाव येथील सभेत स्मारकाच्या कामांना गती देण्याचे वचन दिले होते. त्यानुसार हा निधी मंजूर झाल्याने समाधान व्यक्त होत आहे.

Gulabrao Patil
Makar Sankranti 2024 : बोळके बनविण्यासाठी कारागिरांची लगबग; मकर संक्रांतीनिमित्त वाढती मागणी

तालुक्यातील एकूण कोटींच्या कामांना पर्यटन विभागाकडून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या मागणीनुसार पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांनी मान्यता दिली असून, २ कोटी ७० लाखांचा निधी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडे वितरित करण्यात आला आहे. यामुळे धरणगाव, पाळधी व हेडगेवार नगर परिसरातील भाविकांमध्ये चैतन्य निर्माण झाले आहे.

"बालकवींच्या जन्मगावी त्यांचे स्मारक व्हावे, अशी धरणगाव येथील साहित्यिक प्रेमी आणि आमची प्रखर इच्छा होती. अनेक अडचणी आल्यात. मात्र आता ते स्मारक पूर्णत्वाला येईल, याचा आनंद आहे. या स्मारकामुळे महाराष्ट्रातील साहित्यिक, कवी यांचे स्वप्नपूर्ती होऊन बालकवींच्या साहित्याच्या अभ्यासाला देखील वाव मिळणार आहे. या स्मारकस्थळी बालकवींच्या साहित्याचा अभ्यास करता येईल, असे ग्रंथालय देखील साकारणार आहोत."

- गुलाबराव पाटील, पालकमंत्री

Gulabrao Patil
Jagaon Cotton Crop Insurance: जिल्ह्यात कापूस पीकविम्याच्या रकमेची प्रतीक्षा! शेतकरी संघटनेचा 30 जानेवारीचा ‘अल्टिमेटम’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com