Jalgaon Fraud Crime: खासगी नोकरी करणाऱ्या तरुणास 9 लाखांचा गंडा; बोनसच्या आमिषाला पडला बळी

योगेश मधुकर काळे (४३, रा. विठ्ठलपेठ, जळगाव) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. योगेश काळे हे खासगी नोकरी करतात.
Online Fraud
Online Fraud esakal
Updated on

Jalgaon Fraud Crime : विमा कंपनीकडून बोनस व मेडिकल कव्हरची रक्कम मिळवून देण्याचे अमिष दाखवत जळगावतील तरुणास तब्बल ९ लाख रुपयांत गंडविण्यात आल्याची घटना घडली.

या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. (9 lakh fraud to young man working in private job Jalgaon Fraud Crime news)

योगेश मधुकर काळे (४३, रा. विठ्ठलपेठ, जळगाव) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. योगेश काळे हे खासगी नोकरी करतात. त्यांच्याशी आशिष जैन, दिनेश चतुर्वेदी, गोपाल क्रिशन, जितेंद्र सिंह रंधावा असे नावे सांगणाऱ्या चौघांनी १८ डिसेंबर ते २२ डिसेंबर दरम्यान वारंवार संपर्क साधला.

विमा कंपनीकडून बोनस व मेडिकल कव्हरची रक्कम मिळवून देतो असे सांगत त्यांना एका कंपनीचा १०० रुपये किंमतीचा बनावट बाँड, आयकरचे प्रमाणपत्र व्हॉटसअॅपवर पाठवून त्यांचा विश्वास संपादन केला.

Online Fraud
Jalgaon Fraud Crime: शर्वरी डाहरांची 60 लाखांची फसवणूक; दिरांसह, व्यावसायिक मित्राविरुद्ध गुन्हा दाखल

काळे यांच्याकडून वेळोवेळी आठ लाख ९५ हजार ६४६ रुपये घेतले. बरेच दिवस झाले तरी कोणताही मोबदला मिळत नसल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर काळे यांनी सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

त्यावरून चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस निरीक्षक किसन नजन पाटील करीत आहेत.

Online Fraud
Jalgaon Fraud Crime : चाळीसगावच्या तरुणास 3 लाखांत गंडविले; झटपट श्रीमंतीचा मोह अंगलट

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()