Jalgaon Crime: चाळीसगावी गुप्तधन काढणाऱ्या मांत्रिकासह 9 जण ताब्यात; नाशिक जिल्ह्यातील 5 जणांचा समावेश

Police inspector Sandeep Patil and staff with the suspects who were withdrawing secret money.
Police inspector Sandeep Patil and staff with the suspects who were withdrawing secret money.esakal
Updated on

Jalgaon Crime : गुप्तधन काढण्यासाठी शेतातील पडीक घरात मानवी कवटीच्या अवतीभवती बसून पूजा करणाऱ्या मांत्रिकासह नऊ जणांना शहर पोलिसांनी जादूटोण्याच्या साहित्यासह ताब्यात घेतले.

या कारवाईचे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे माजी अध्यक्ष प्रा. गौतम यांनी कौतुक केले आहे. (9 people arrested including witch doctor who extracted hidden money in Chalisgaon Including 5 people from Nashik district Jalgaon Crime)

पोलिसांनी जप्त केलेल्या मानवी कवटीसह जादूटोण्याचे साहित्य.
पोलिसांनी जप्त केलेल्या मानवी कवटीसह जादूटोण्याचे साहित्य.esakal

शहरातील नागद रोड परिसरातील पेट्रोलपंपाच्या बाजूच्या शेतातील पडीक घरात काही मांत्रिक गुप्तधन काढण्याच्या तयारीत असल्याची माहिती शहर पोलिसांना मिळाली.

त्या आधारे पोलिसांनी तेथे छापा टाकला असता मांत्रिकासह काही जण गुप्तधन काढण्याच्या उद्देशाने पूजा करताना मिळून आले. सर्व जण मानवी कवटीच्या सभोवताली बसलेले होते.

मांत्रिक त्याचे साथीदार अघोरी पूजा करताना आढळून आले. या प्रकरणी लक्ष्मण श्यामराव जाधव (रा. चाळीसगाव), शेख सलीम कुतुबुद्दीन शेख (रा. चाळीसगाव), अरुण कृष्णा जाधव (रा. आसरबारी, ता. पेठ, जि. नाशिक), विजय चिंतामण बागूल (जेल रोड, नाशिक रोड), राहुल गोपाल याज्ञीकरा (रा. ननाशी, ता. दिंडोरी, जि. नाशिक),

अंकुश तुळशीदास गवळी (रा. जोरपाडा, ता. दिंडोरी, जि. नाशिक), संतोष नामदेव वाघचौरे (रा. अशोकनगर, नाशिक), कमलाकर नामदेव उशिरे (रा. गणेशपूर पिंप्री, ता. चाळीसगाव) व संतोष अर्जुन बाविस्कर (रा. अंतुर्ली, ता. एरंडोल) या नऊ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

या सर्वांच्या विरोधात महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट, अघोरी प्रथा व जादुटोणा यांना प्रतिबंध घालण्याबाबत आणि त्याचे समूळ उच्चाटन करण्याबाबतच्या अधिनियमाच्या कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी घटनास्थळावरून पूजेच्या साहित्यासह मोबाईल फोन, टोयोटा युनोव्हा कार (एमएच १६, एटी ७५५७) असा सुमारे आठ लाख ३५ हजार १०० रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Police inspector Sandeep Patil and staff with the suspects who were withdrawing secret money.
Ahmednagar Crime News : राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यावर खुनी हल्ला, भाजप नगरसेवकासह आठ जणांविरुद्ध गुन्हा; चौघे ताब्यात

अमावास्येला काढणार होते गुप्तधन

सोमवारी (ता. १७) आषाढ अमावास्या असल्याने गुप्तधन मिळविण्यासाठी ही पूजा केली जात असल्याची माहिती प्राथमिक चौकशीत पोलिसांना मिळून आली.

नागद रोड परिसरातील शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये अघोरी पूजेसाठी मानवी कवटी, लिंबू, नारळ, रुद्राक्षांची माळ, देवाची पितळी मूर्ती, पिवळ्या धातूचा नाग, पत्र्यावरील छापील देव, काही कंदमुळे, गोलाकार पितळी धातूचे बेरकंगण, केशरी शेंदूर, अगरबत्तीचा पुडा, लोखंडी अडकित्ता, कापूर आदी साहित्य मिळून आले.

ही पूजा करून मांत्रिक गुप्तधन काढून देणार असल्याची माहिती मिळाली असून, त्यादृष्टीने पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

"गुप्तधन काढून देण्यासाठीच ही पूजा केली जात असल्याची माहिती आतापर्यंतच्या चौकशीत मिळून आली आहे. संशयितांकडे मिळून आलेली मानवी कवटी न्याय वैज्ञानिक प्रयोगशाळेत (फॉरेन्सिक लॅब) आम्ही पाठविणार आहोत. त्यानंतर पुढील योग्य ती कारवाई करू."

- संदीप पाटील, पोलिस निरीक्षक, शहर पोलिस ठाणे

Police inspector Sandeep Patil and staff with the suspects who were withdrawing secret money.
Jalna Crime : जिल्ह्यातील गुन्हेगारी नियंत्रणात आणण्यासाठी हद्दपारीचे प्रस्ताव निकालाच्या प्रतीक्षेत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.