Jalgaon Crime News : फेसबुक फ्रेण्डकडून विवाहितेवर अत्याचार

Abuse of married woman by Facebook friend jalgaon crime news
Abuse of married woman by Facebook friend jalgaon crime newsesakal
Updated on

Jalgaon Crime News : शहरातील ३२ वर्षीय विवाहितेवर नंदुरबार येथील भामट्याने अत्याचार केला. फेसबुकवरून ओळखी होऊन त्यातून प्रेमसंबंध प्रस्थापित झाले.

लहान मुलास मारून टाकण्याची धमकी देत संशयिताने पीडितेवर दोन वर्षे अत्याचार केला. याप्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाली आहे. (Abuse of married woman by Facebook friend jalgaon crime news)

३२ वर्षीय विवाहिता पती व दोन मुलांसह वास्तव्यास आहे. पती-पत्नी मोलमजुरी करून कुटुंबीयाची गुजराण करतात. सुमारे दोन वर्षांपूर्वी दीपक देवानंद टाक (रा. नंदुरबार) याच्याशी फेसबुकवर मैत्री झाली.

मैत्रीतून ओळख आणि त्यातून दोघांचे प्रेम बहरले. दोघांच्या जळगावला पीडितेच्या घरी भेटीगाठी होत होत्या. भेटीदरम्यान संशयित दीपक याने विवाहितेशी बळजबरीने शारीरीक संबध प्रस्थापीत केले. संबंध ठेवण्यास नकार दिल्याने संशयिताने पीडितेस दमदाटी करून मारहाण केली, तसेच बदनामीची धमकी देत पैशांची मागणी केली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Abuse of married woman by Facebook friend jalgaon crime news
Jalgaon Crime News : धक्कादायक! जन्मदात्या बापानेच केला मुलीवर अत्याचार

पीडितेने ओळखीच्या व्यक्तीद्वारे दीपक टाक यास वेळोवेळी पैशांची पूर्तताही केली. तरीही त्याचा त्रास कमी न होता, वाढतच गेला. पीडितेला त्रास असह्य झाल्याने तिने विरोध करण्यास सुरवात केली.

दीपक टाक याने पीडितेच्या लहान मुलास मारून टाकण्याची धमकी देत अत्याचार सुरूच ठेवला. अखेर कंटाळून पीडितेने पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यावरून संशयित दीपक टाक याच्याविरुद्ध अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस नाईक शिल्पा पाटील तपास करीत आहे.

Abuse of married woman by Facebook friend jalgaon crime news
Jalgaon Crime News : वाहकाकडून महिलेची छेडखानी; बसमध्ये चढताना-उतरताना स्पर्श

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.