Crime News : धुळपिंप्री (ता. पारोळा) येथील अल्पवयीन मुलीवर अमानुष अत्याचार करत डोक्यावर दगडाने मारून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना गुरुवारी (ता. १०) सायंकाळी पाचच्या सुमारास घडली.
याबाबत पोलिसांनी संशयितास ताब्यात घेतले असून, आरोपीस कठोर शिक्षा व्हावी, यासाठी शुक्रवारी (ता. ११) माजी पालकमंत्री डॉ. सतीश पाटील यांनी पारोळा पोलिस ठाण्यात पोलिस निरीक्षक सुनील पवार यांची भेट घेऊन मागणी केली. तसेच पीडित मुलीच्या नातेवाईकांना भेटून डॉ. पाटील यांनी धीर दिला. (Abuse of minor girl in parola jalgaon crime news)
पारोळा पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार गुरुवारी (ता. १०) तक्रारदार व पीडित मुलीची आई शेतात काम करीत होते. यावेळी पीडित मुलगी ही घरी होती. दरम्यान, पीडित मुलगी ही सायंकाळी पाच ते साडेपाचच्या सुमारास शौचालयास गेली असता परिसरातील नदीपात्राजवळ संशयित बारक्या उर्फ अशोक मंगा भिल याने मुलीशी बळजबरी करत डोक्यावर दगडाने मारून व दोरीने गळा आवळून जीवे मारण्याचा प्रयत्न केला.
या वेळी पीडित मुली सर्व हकीगत नातेवाईकांना सांगितली. या वेळी नातेवाईकांनी उपचारासाठी कुटीर रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर पुढील उपचारासाठी धुळे येथे दाखल केले. या प्रकरणी पारोळा पोलिसात संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक राजू जाधव तपास करीत आहेत.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
पोलिस ठाण्यात माजी पालकमंत्री डॉ. सतीश पाटील यांच्यासोबत किसान महाविद्यालयाचे संचालक अशोक पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस महिला अध्यक्ष सुवर्णा पाटील, सावखेडे तुर्क येथील युवा नेतृत्व सुनील रामोशी, एकलव्य संघटनेचे रवींद्र वाघ, बाळू मालचे, धुळपिंप्री येथील सरपंच निंबा पाटील व ग्रामस्थ उपस्थित होते.
राज्य सरकारने लक्ष घालावे : डॉ. पाटील
गोंडगाव येथील घटनेला आठ दिवस होत नाही, तोवर पारोळा तालुक्यातील धुळपिंप्री येथे एका चौदा वर्षीय मुलीवर अत्याचार करून जिवे मारण्याचा प्रयत्न झाला.
ही बाब चिंतनीय असून, अशा नराधमांवर अंकुश लावण्यासाठी राज्य सरकारने गंभीर होणे गरजेचे असून कायदा व सुव्यवस्थेबाबत राज्य सरकारने लक्ष घालावे. गोंडगावची पुनरावृत्ती धुळपिंप्री येथे झाली आहे. धुळपिंप्री येथील पीडित मुलगी धुळे येथे औषध उपचार घेत आहे. यासाठी सरकारने कायदा कडक करण्याचे त्यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.