ट्रक ‘रिव्हर्स’ घेतांनाना हमालाचा भिंतीत दबून मृत्यू 

ट्रक ‘रिव्हर्स’ घेतांनाना हमालाचा भिंतीत दबून मृत्यू 
Updated on

जळगाव : एमआयडीसीतील कक्कड उद्योग दालमिलमध्ये सकाळी पावणेआठला ट्रकने हमालाला चिरडल्याची घटना घडली. माल घेऊन आलेला ट्रक मागे घेत असताना चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने ट्रकमागे उभे असलेल्या ४५ वर्षीय हमालास ट्रकने भिंतीत दाबून टाकल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. एमआयडीसी पोलिसांत या प्रकरणी गुन्ह्याची नोंद करण्यात आली. ट्रकचालक घटनास्थळावरून फरारी झाला. गणेश चव्हाण (वय ४५, रा. लियानी, ता. एरंडोल, ह.मु. पोलिस कॉलनी) असे मृत मजुराचे नाव आहे. 

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश चव्हाण (वय ४५) एमआयडीसीत डी-सेक्टरमधील कक्कड उद्योग दालमिल कंपनीत हमाल म्हणून गेल्या वर्षापासून कामाला होते. नेहमीप्रमाणे ते सकाळी सातला कामावर आले. दालमिलमध्ये आलेला माल उतविण्यासाठी ७.४५ च्या सुमारास ट्रक (जीजे ३४, टी ९४७७) आलेला होता. ट्रक मागे घ्यायचा असल्याने गणेश चव्हाण यांनी इशारा केलेला होता. ते मागेच भिंतीजवळ उभे असताना चालकाने ट्रक रिव्हर्समध्ये घेतला. परंतु ट्रकवरील ताबा सुटल्याने ट्रक जोरात मागे आला. गणेश चव्हाण भिंत आणि ट्रक यात दाबले गेल्याने त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना घडताच चालक ट्रक सोडून घटनास्थळावरून पसार झाला. 

कामगारांनी केले मदतकार्य : 
घटना घडली त्याच्या समोरच चटई कंपनीत काम करणाऱ्या राहुल जाधव यांच्यासह इतरांनी घटनास्थळी धाव घेतली. ट्रकमध्ये दाबले गेलेले राहुलचे मामा असल्याचे आढळून आले. दालमिल कंपनीच्या मालकाने तातडीने खासगी वाहनाने गणेश चव्हाण यांना सुरवातील खासगी ट्रॉमा सेंटरमध्ये आणले. तपासणीअंती डॉक्टरांनी जिल्‍हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नेण्याचे सांगितले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर गणेश चव्हाण यांना मृत घोषित केले. 

डबा घेऊन नुकतेच गेले अन्‌ 
गणेश चव्हाण सकाळी सातलाच कामावर डबा घेऊन निघून गेले. अवघ्या तासाभरात वाईट बातमी त्यांच्या कुटुंबीयांना कळाली. तसेच कुटुंबीयांनी वैद्यकीय महाविद्यालयात धाव घेतली. चव्हाण कुटुंबीयांनी मृतदेह बघताच हंबरडा फोडला. मृताच्या मागे पत्नी निर्मलाबाई, गजानन, गोविंदा आणि सनी हे तीन मुलगे आणि दोन विवाहित मुली असा परिवार आहे. मृताचा भाचा राहुल जाधव यांच्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलिसांत ट्रकचालकावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.