Jalgaon Accident Spot : शहरात ठिकठिकाणी मृत्यूचे ‘ब्लॅक स्पॉट’; मार्ग चौपदरी झाला, पण धोका वाढला!

Accident site near Tarsod Fata on the highway and Akashvani Chowk of technically defective circle.
Accident site near Tarsod Fata on the highway and Akashvani Chowk of technically defective circle.esakal
Updated on

Jalgaon Accident Spot : अनेक वर्षांपासून मागणी असलेल्या शहरातील महामार्गाचे चौपदरीकरण झाले खरे, मात्र हे सदोष आणि तांत्रिकदृष्ट्या चुकीचे झालेले कामच नागरिकांच्या जिवावर उठले आहे.

शहराच्या हद्दीतून तरसोद फाट्यापर्यंत जाताना वाहनधारकांना अक्षरश: जीव मुठीत घेऊनच जावे लागते. कारण महामार्गावर ठिकठिकाणी मृत्यूचे ‘ब्लॅक स्पॉट’ यमराजसारखी वाटच पाहताय.

जळगाव शहरातून जाणाऱ्या महामार्गाच्या दोन्ही बाजूंना शहराचा विस्तार मोठ्या प्रमाणात झाला. त्यामुळे वाहनांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे महामार्गावरील वाहतुकीचा भार प्रचंड वाढतोय. (accident spot in various places of city jalgaon news)

या पार्श्‍वभूमीवर महामार्गलगत सेवा रस्ते (सर्व्हिस रोड) करण्यासह चौपदरीकरणाची मागणी अनेक वर्षांपासून होती. ती कशीतरी पूर्ण झाली आणि ६९ कोटींच्या निधीतून खोटेनगर ते कालिकामाता चौकापर्यंतच्या सात किलोमीटरचा टप्पा मंजूर झाला.

तांत्रिकदृष्ट्या सदोष काम

शहरातील महामार्गाचे चौपदरीकरण झाले. मात्र, ते तांत्रिकदृष्ट्या सदोष व अनेक ठिकाणी त्रुटी असल्याचे जळगावातील तज्ज्ञांनी वेळोवेळी लक्षात आणून दिले. या तांत्रिक चुका जळगावकरांच्या नेहमीच मानगुटीवर असून, त्यामुळे ठिकठिकाणी अपघातांचे धोके वाढले आहेत. उलटपक्षी ‘आधीचा महामार्ग बरा होता’ असे म्हणायची वेळ आली आहे.

हे आहेत ‘ब्लॅक स्पॉट’

खोटेनगरपासून कालिकामाता चौकापर्यंत नव्याने झालेल्या महामार्गावर ठिकठिकाणी अपघातांचा धोका वाढला आहे. मानराज पार्कसमोर रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी येणाऱ्या वाहनांमुळे धोका आहे. पुढे शिव कॉलनीजवळ क्रॉसिंग असून, त्याठिकाणी रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी येणाऱ्या वाहनांची मोठी संख्या आहे. त्यामुळे गतिरोधक करूनही याठिकाणी अपघात होतच असतात.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Accident site near Tarsod Fata on the highway and Akashvani Chowk of technically defective circle.
तुमच्या आणि कुटुंबियांच्या सुरक्षिततेसाठी Personal Accident Cover गरजेचं
धोकादायक ठरत असलेला अजिंठा चौक.
धोकादायक ठरत असलेला अजिंठा चौक.esakal

अग्रवाल हॉस्पिटलजवळील भुयारी मार्ग शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या गर्दीने धोकादायक बनला आहे; तर पुढे आकाशवाणी चौकातही उड्डाणपुलावरून सुसाट येणारी वाहने व तांत्रिकदृष्ट्या दोषपूर्ण असलेल्या सर्कलमुळे हा स्पॉट मोठा धोकादायक ठरतोय. त्यापुढच्या इच्छादेवी चौकातही धोकादायक सर्कलमुळे वाहनांचे अपघात होत असतात.

हीदेखील धोकादायक ठिकाणे

याशिवाय, रिलायन्स पेट्रोलपंपाच्या अलीकडे रामेश्‍वर कॉलनीकडे जाणाऱ्या क्रॉसिंगवर वाहनांची झुंबड उडते. याठिकाणी अनेकदा अपघात झाले असून, मोठ्या अपघाताची भीती नाकारता येत नाही. अजिंठा रस्त्यावर चौपदरीकरण झाले असले, तरी अजिंठा चौकातील सर्कलमुळे हा चौकही ‘ब्लॅक स्पॉट’ ठरला आहे. अनेकांना या चौकावर जीव गमवावा लागला.

वाहतूक पोलिस नावालाच!

या ‘ब्लॅक स्पॉट’वर प्रत्येक ठिकाणी वाहतूक पोलिस असतीलच, असे नाही. चौकांमध्ये वाहतूक पोलिस दिसून येतात. मात्र, ते नावालाच असतात. आकाशवाणी चौकात पोलिस असूनही उपयोग नाही. मंत्री व पोलिस अधिकाऱ्यांचे वाहन येते, तेव्हाच ते सक्रिय होतात.

Accident site near Tarsod Fata on the highway and Akashvani Chowk of technically defective circle.
Precautions To Avoid Accidents : सफर सुहाना, पण सावधगिरी गरजेची
इच्छादेवी चौकाजवळील रिलायन्स पेट्रोलपंपाजवळील अपघात स्पॉट
इच्छादेवी चौकाजवळील रिलायन्स पेट्रोलपंपाजवळील अपघात स्पॉटesakal

एरवी पोलिसांचे अस्तित्व याठिकाणी जाणवत नाही. तीन दिवसांपूर्वी ओव्हरटेकच्या नादात डंपरने दिलेल्या धडकेत किराणा दुकानदार तरुणाचा जागीच बळी गेला. हा अपघात वाहतूक पोलिस ड्यूटीवर असताना आकाशवाणी चौकातच झाला.

सर्कलमुळे ड्यूटी करणे कठीण

मुळात महामार्गाचे चौपदरीकरण करताना सर्वांत जास्त वर्दळ असलेल्या आकाशवाणी, इच्छादेवी व अजिंठा चौक याठिकाणी उड्डाणपुलांची गरज असताना, या प्रत्येक चौकात सर्कल देण्यात आले. ही सर्कलच मुळात चौकांमध्ये अपघातांचा धोका वाढविणारी ठरत आहेत. या सर्कलना कुठेही तांत्रिकदृष्ट्या मान्यता नसल्याचे तज्ज्ञ सांगतात.

तरीही तत्कालीन प्रकल्प संचालकांनी सर्कलचे काम उरकून घेतले. या सर्कलवर वाहतूक पोलिसही ड्यूटी करू शकत नाहीत. कारण, सर्कल असल्याने वाहतूक नियमन करण्यासाठी पोलिसाने नेमके कुठे उभे राहावे, ही अडचणही लक्षात घेतली पाहिजे.

Accident site near Tarsod Fata on the highway and Akashvani Chowk of technically defective circle.
Chandrayaan 3 : खानदेशसाठी गौरवास्पद! ‘चांद्रयान-३’च्या लाँचिंगमध्ये जळगावचा ‘खारीचा वाटा’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.