जळगाव : भरधाव वेगाने दुचाकीवर येत इलेक्ट्रिक खांब्याला आदळल्याने तरूणाचा मृत्यू (Death) झाला होता. याप्रकरणी शनिवारी (ता. १६) तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. राहुल सिध्दार्थ सोनवणे (वय २३, रा. फुफनगरी, ता. जळगाव) असे मृत तरूणाचे नाव आहे. (Accidental death of youth case filed by Taluka Police jalgaon Latest Marathi News)
राहुल हा वडील, मोठा भाऊ आणि बहिण यांच्यासह वास्तव्याला होता. हातमजुरी करून आपला उदरनिर्वाह करत होता. राहुल हा ५ जुलै रोजी कानळदा येथे कामावर गेला होता. काम आटोपून दुचाकीने (एमएच १९ डीएल ४०४६) घरी परतत असताना सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास त्याचा दुचाकीवरील ताबा सुटल्याने दुचाकी समोरील इलेक्ट्रीक पोलवर आदळली.
त्या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. रस्त्यावरील नागरीकांनी धाव घेत त्याला खासगी वाहनाने जिल्हा शासकीय रूग्णालयात नेत असताना रस्त्यात त्याचा मृत्यू झाला होता. घटनेनंतर ११ दिवसानंतर अपघातात झालेल्या मृत्यूच्या कारणासाठी स्वत: मयत राहुल सोनवणे हा जबाबदार असल्याने जळगाव तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.