जन्मठेपेची शिक्षा सुनावलेल्या आरोपीला तब्बल 16 वर्षांनंतर अटक

Jalgaon Crime news
Jalgaon Crime newssakal
Updated on

जळगाव : जिल्हापेठ पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा (life imprisonment) सुनावलेल्या आरोपीला तब्बल १६ वर्षांनंतर अटक (Arrest) करण्यात स्थानिक गुन्हे शाखेस यश आले आहे. (Accused sentenced to life imprisonment arrested after 16 years jalgaon news)

शहरातील समतानगरातून शुक्रवाारी (ता. १७) ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली. जिल्हापेठ पोलिस स्टेशनला सन १९९९ मध्ये खुनाच्या गुन्ह्यात शिक्षा झालेल्या बंदी फरार आरोपी प्रदीप सोनू मेढे (वय ५८, रा. वंजारी टेकडी, समतानगर, जळगाव) यास जिल्हा व सत्र न्यायालय, जळगाव यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. आरोपीने त्याविरोधात खंडपीठात आव्हान दिले असता, खंडपीठाने शिक्षा कायम केली होती. नंतर आरोपीने सर्वोच्च न्यायालयात गेल्यानंतर त्यास सन २००६ मध्ये अपील जामीनावर सुटलेला होता.

Jalgaon Crime news
जळगाव : बोदवडला ‘स्वच्छ सर्वेक्षणा’चे तीनतेरा

मात्र, सर्वोच्च न्यायालयाने आरोपींना शिक्षा कायम केली आहे. तरीही प्रदीप मेढे हा न्यायालयात हजर झालेला नाही. तेव्हापासून तो फरार होता. पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांच्या आदेशानुसार एलसीबीचे पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले यांनी पथक नियुक्त करून फरार प्रदीप मेढेस आज अटक केली. उपनिरीक्षक अमोल देवढे, हवालदार सुनील दामोदरे, अश्रफ शेख, कॉन्स्टेबल नंदलाल पाटील, भगवान पाटील, प्रमोद लाडवंजारी, राजेंद्र पवार यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Jalgaon Crime news
घरात घुसून मारहाण प्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.