Fraud Crime
Fraud Crimeesakal

Jalgaon Fraud Crime : निर्मल सीडस ब्रॅन्डद्वारे फसवणूक करणाऱ्या कंपनीविरुद्ध कारवाई

Published on

Jalgaon Fraud Crime : येथील निर्मल सीड्‌स या बियाणे कंपनीचा देशभर विस्तार आहे. गुणवत्तापूर्ण बियाण्यांमुळे लोकप्रिय असलेल्या या कंपनीच्या नावाने हरियानातील कर्नाल येथे एका बनावट व्यावसायिकाने निर्मल ब्रॅन्डची व्यापारी चिन्हाची व नावाची नक्कल करून ‘न्यू निर्मल सीड्स’ या नावाने कंपनी सुरू केली.

त्याद्वारे बियाण्यांची विक्री करून शेतकऱ्यांची फसवणूक केली असता त्याविरुद्ध याचिका दाखल केल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशान्वये मुंबई यांनी त्या बोगस कंपनीविरुद्ध कार्यवाही करून कंपनीने उत्पादित केलेला बनावट माल सील केला आहे. (Action against company for cheating by Nirmal Seeds brand jalgaon fraud crime )

निर्मल सीड्‌सचे ‘निर्मल’ हे व्यापारी चिन्ह सुरवातीपासूनच अधिकृत व नोंदणीकृत आहे. त्यामुळे ते कोणालाही वापरता येत नाही. परंतु कर्नाल (हरियाना) येथे ‘निर्मल’ या चिन्हाचा वापर व नावाची नक्कल करून बोगस व बनावट बियाणे विक्री करताना आढळून आले होते.

अशा निकृष्ट दर्जाच्या बनावट बियाण्यांमुळे शेतकरी व जनतेची फसवणूक होत असल्याचे आढळून आल्यानंतर त्याविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयात ट्रेडमार्क अॅक्ट अंतर्गत याचिका दाखल करण्यात आली होती.

उच्च न्यायालयाने निर्मल सीड्‌सचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर सर्व नोंदी, पुरावे, कागदपत्रांची तपासणी करून व्यापारी नाव, ट्रेडमार्क, लेबल या अधिकाराचे उल्लंघन करणाऱ्या कर्नाल येथील संबंधित ठिकाणावर छापा टाकण्यासाठी कमिशनरांची नियुक्ती केली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Fraud Crime
Jalgaon Fraud Crime : बनावट बिलांद्वारे सरकारची 26 कोटींत फसवणूक

त्यानुसार पोलिसांना सोबत घेऊन त्या ठिकाणी छापे टाकून उल्लंघन करणाऱ्या वस्तू, पॅकेजिंग साहित्य जप्त करून सील केले. निर्मल सीड्‌स कंपनी, तिचा ब्रॅन्ड ‘निर्मल’ हे चिन्ह संरक्षित असून, कायदेशीररीत्या नोंदणीकृत आहे.

त्याचा वापर अशा रीतीने कोणालाही करता येणार नाही. परंतु कर्नाल येथील कंपनीने ‘निर्मल’ या चिन्हाचा केलेला वापर हा योगायोग असू शकत नाही. त्यामुळे निर्मल सीड्‌सचे मोठे नुकसान झाले असून, ते पैशाने भरून निघणार नाही, असे मतही मुंबई उच्च न्यायालयाने नोंदविले आहे.

Fraud Crime
Jalgaon Fraud Crime : ग्राहक सेवा केंद्र चालकाची फसवणूक; भामट्याविरुद्ध पारोळ्यात गुन्हा दाखल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.