Jalgaon Crime: जिल्ह्यात वर्षभरात 52 जणांविरुद्ध ‘एमपीडीए’अंतर्गत कारवाई; वाळू तस्कर, हातभट्टीवाले रडारवर

Action under MPDA against 52 people in district in year jalgaon news
Action under MPDA against 52 people in district in year jalgaon news
Updated on

Jalgaon Crime : जिल्हाभर फोफावलेले अट्टल गुन्हेगार, वाळू तस्कर व‌ हातभट्टी गुंडांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. वर्षभरात ५२ गुन्हेगारांना ‘एमपीडीए’ कायद्यांतर्गत गजाआड करण्यात आले आहे. या ५२ गुन्हेगारांवर गंभीर स्वरूपाचे ५१३ गुन्हे दाखल आहेत. पोलिसांच्या या कारवाईमुळे जिल्ह्यातील गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत.

जिल्हा पोलिसांनी प्रतिबंधक कारवाईवर जोर दिला आहे. जानेवारी ते डिसेंबर २०२३ मध्ये ५२ जणांवर अट्टल गुन्हेगार, हातभट्टीवाले, औषधी द्रव्यविषयक गुन्हेगार आणि धोकादायक व्यक्तींच्या विघातक कृत्यांना आळा घालण्यासाठी महाराष्ट्र झोपडपट्टी गुंड (एमपीडीए) कायद्यांतर्गत कारवाई केली आहे. (Action under MPDA against 52 people in district in year jalgaon news)

विविध ठिकाणी कारवाई

अमळनेरमध्ये दोघांविरुद्ध आणि भुसावळ व‌ चाळीसगावमधील प्रत्येकी एकाविरुद्ध जानेवारी २०२३ मध्ये जणांवर कारवाई करण्यात आली आहे. फेब्रुवारी २०२३ मध्ये जळगावमधील एकावर, मार्च २०२३ मध्ये जळगावमधील दोघांवर आणि अमळनेर व भुसावळमधील प्रत्येकी एकावर, एप्रिल २०२३ मध्ये चाळीसगाव, रावेर, जळगावमधील प्रत्येकी एकाविरुद्ध कारवाई केली आहे.

इतर महिन्यात कारवाई करण्यात आलेल्यांची संख्या अशी : मे २०२३- चोपडा, जळगाव व अमळनेरमधील प्रत्येकी एक. जून २०२३-जळगावमधील तिघे आणि भुसावळ व यावलमधील प्रत्येकी एक. जुलै २०२३-भुसावळमधील तिघांसह अमळनेर, चाळीसगाव व जळगावमधील प्रत्येक एक. ऑगस्ट २०२३-जळगावमधील तिघे, भुसावळमधील दोघे आणि अमळनेर व चोपडामधील प्रत्येक एक.

सप्टेंबर २०२३- जळगावमधील सहा. ऑक्टोबर २०२३-जळगावमधील दोघे आणि भुसावळ, चाळीसगाव व अमळनेरमधील प्रत्येक एक. नोव्हेंबर २०२३-एरंडोलमधील एक वाळू तस्कर. डिसेंबर २०२३-आतापर्यंत भडगाव, यावल, जळगाव व एरंडोलमधील एक. एक गुन्हा उत्पादन शुल्क विभागाने दाखल केला आहे.

Action under MPDA against 52 people in district in year jalgaon news
Jalgaon Crime: जळगावात ‘पोलिसिंग’ संपल्यात जमा; चॉपर लावला...तलवारीने हल्ला.. तरी ‘एनसी’ दाखल

कारवाईची प्रक्रिया

जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयाकडून जिल्हाधिकारी कार्यालयात ‘एमपीडीए’ अंतर्गत कारवाईचा प्रस्ताव दिला जातो. जिल्हाधिकाऱ्यांनी अंतिम मान्यता दिल्यानंतर गुन्हेगारांवर स्थानबद्धतेची कारवाई करण्यात येते. जिल्ह्यात ‘एमपीडीए’ दाखल गुन्हेगारांना नाशिक, छत्रपती संभाजीनगर, येरवडा, ठाणे, अमरावती, कोल्हापूर, नागपूर व मुंबई येथील मध्यवर्ती कारागृहात एक वर्षासाठी स्थानबध्द करण्यात आले आहे. मुसक्या आवळण्यात आलेल्या गुन्हेगारांत सर्वाधिक वाळू तस्कर व हातभट्टीवाल्यांचा समावेश आहे.

अवैध वाहतुकीचे २९ गुन्हे

‘एमपीडीए’ अंतर्गत कारवाई करण्यात आलेल्या ५२ जणांवर गंभीर स्वरूपाचे ५१३ दाखल आहेत‌. खून, खूनाचा प्रयत्न, दरोडा, बलात्कार, जबरी चोरी, जातीय दंगल, विनयभंगासारखे गंभीर गुन्हे करणाऱ्या ३७ धोकादायक गुन्हेगारांवर ३७१ गुन्हे दाखल आहेत. वाळूची अवैध गौण खनिज वाहतूक करणाऱ्या चार जणांवर २९ गुन्हे दाखल आहेत. हातभट्टी व्यवसाय करणाऱ्या अकरा जणांवर ११४ गुन्हे दाखल आहेत.

‘एमपीडीए’ कायद्याबाबत

झोपडपट्टीदादा, हातभट्टीवाले, औषधी द्रव्यविषयक गुन्हेगार व धोकादायक व्यक्ती, दृकश्राव्य कलाकृतीचे विनापरवाना प्रदर्शन करणाऱ्‍या व्यक्तींच्या विघातक कृत्यास आळा घालण्याबाबत अधिनियम १९८१ म्हणजेच, ‘एमपीडीए’.सराईत गुन्हेगार अथवा सार्वजनिक कायदा व सुव्यवस्था भंग करणाऱ्‍या कोणत्याही व्यक्तींविरुद्ध ‘एमपीडीए’ची कारवाई करता येते. या कायद्यानुसार सराईत गुन्हेगाराला एक वर्षासाठी कारागृहात स्थानबद्ध करण्यात येते.

Action under MPDA against 52 people in district in year jalgaon news
Jalgaon Crime News: चोपड्यात लिपिकाने केला 50 लाखांचा गैरव्यवहार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.