Jalgaon Crime News : अवैध वाळू वाहतूक प्रकरणी 15 वाहनांवर कारवाया

sand
sandesakal
Updated on

Jalgaon News : महसूल विभागातर्फे अवैध वाळू व गौण खनिज वाहतूक करणाऱ्या १५ वाहनांवर कारवाई केली असून ७ लाख ३७ हजार ८६५ रुपयांच्या दंडाच्या नोटीसा संबंधिताना देण्यात आल्या आहेत. ही सर्व वाहने पोलिस ठाण्यात जमा करण्यात आली आहेत. (Actions on 15 vehicles in case of illegal sand transport jalgaon news)

गोपाळ किसन पाटील यांचा टेम्पो (क्रमांक- एम. एच. ०५ एजी ६३८१), संदीप जगन्नाथ पारधी यांचे ट्रॅक्टर (क्रमांक- एम. एच. १९ सीजे १४०२) व ट्रॉली (क्रमांक एम. एच. १९, ५९५८), राहुल काशिनाथ शिंपी यांचा टेम्पो (क्रमांक- एम. एच. ०२, एचए ६२६५), भूषण दीपक धनगर यांचा टेम्पो (क्रमांक- एम. एच. ०५, ९१२२), जयेश युवराज पाटील यांचा लाल रंगाचा विना नंबरचा टेम्पो,

ललित कैलास पाटील यांचे ट्रॅक्टर (क्रमांक- एम. एच. ०१ एलए ३०३३), मुनाफ पठाण यांचे ट्रॅक्टर (क्रमांक- एम. एच. १९, बीजी ५४०) व ट्रॉली (क्रमांक- एम. एच. १९ ई ३४२३), विश्वास संतोष पाटील यांचे ट्रॅक्टर (क्रमांक- एम. एच. १९, बीजी ६४०२), अकबरखा युसुफखा पठाण यांचे ट्रॅक्टर (क्रमांक- एम. एच. २१ एडी ३७८५), भय्या शांताराम पाटील यांचे ट्रॅक्टर (क्रमांक- एम. एच. १९, एएल ४४६०),

sand
Sand Smuggling News : अवैध वाळू वाहतूक करणारे डंपर, ट्रॅक्टर जळोदला पकडले

आकाश शिंपी यांचे ट्रॅक्टर (क्रमांक- एम. एच. १९, सीई १६७६), धनराज मधुकर पाटील यांचा विना नंबरचा टेम्पो, हेमंत राजेंद्र पवार यांचे ट्रॅक्टर (क्रमांक- एम. एच. १९, सीयू १७४७), शेख वहाब गफूर यांचा टेम्पो (क्रमांक- एम. एच. ०२, बी ९९०७), मुकद्दर अली जोहर अली यांचे ट्रॅक्टर (क्रमांक- एम. एच. ०२ वाय ३४८१) या वाहनांना अवैध वाळू वाहतूक व गौण खनिज वाहताना तलाठी पथकाने रंगेहाथ पकडून पोलिस ठाण्यात जमा केले.

तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांनी सर्व वाहनांना एकूण सात लाख ३७ हजार ८६५ रुपयांच्या दंडाची नोटीस बजावली आहे. दरम्यान, यातील तीन वाहनांचा दंड भरल्याने त्यांची मुक्तता करण्यात आल्याचे तहसील प्रशासनाकडून सांगण्यात आले.

sand
New Sand Policy : ठेकेदारांनी पाठ फिरविल्याने नवे वाळू धोरण संकटात

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.