जळगाव : अदानी (Adani) समुहाकडे पैसे नसतानाही देशातील बंदरे, विमानतळाचे मक्ते दिले. एलआयसी, बँका, प्राव्हिडेंट फंड या क्षेत्रातून सर्वसामान्य जनतेचा पैसा त्यांना दिला. मात्र, आज हेच पैसे बुडीत होण्याचा धोका निर्माण झाला आहे. (Adani Scam Sponsored by Central Government Allegation by Sanjay Lakhe patil jalgaon news)
देशातील हा मोठा घोटाळा असून, केंद्र सरकारच्या माध्यमातून करण्यात आला आहे, असा आरोप कॉंग्रेसचे प्रवक्ते संजय लाखे पाटील यांनी शुक्रवारी (ता. ३१) येथे केला.
उद्योगपती अदानी उद्योग समूहाच्या घोटाळ्याची माहिती जनतेला देण्यासाठी कॉंग्रेसतर्फे कॉंग्रेस भवनात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार, माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, माजी जिल्हाध्यक्ष उदय पाटील, महानगराध्यक्ष श्याम तायडे, युवक कॉंग्रेस अध्यक्ष देवेंद्र मराठे, ज्ञानेश्वर कोळी आदी उपस्थित होते.
संजय लाखे पाटील म्हणाले, की केंद्र सरकारने अदानींमार्फतच हा भ्रष्टाचार केला आहे. गेल्या दहा वर्षांत अदानी यांना भारतातील विमानतळ, बंदरे, इतर क्षेत्रातील मक्ते देण्यात आले. विशेष म्हणजे त्यासाठी एलआयसी, प्रॉव्हिडेंट फंड, राष्ट्रीयकृत बँकेतून पैसेही पुरविण्यात आले.
हेही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??
अदानी म्हणजेच नरेंद्र मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर संजय लाखे पाटील यांनी थेट आरोप केला. ते म्हणाले, की अदानी म्हणजेच नरेंद्र मोदी आहेत. त्यामुळेच अदानी यांना संरक्षण देण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करीत आहे. त्यामुळेच अदानी यांची चौकशी होऊ दिली जात नाही.
राहुल गांधीचाही आवाज दाबला
कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी या भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवित आहेत. संसदेत त्यांचा आवाजाही दाबला गेला. त्यांना संसदेत बोलू दिले नाही. अनेक वेळा त्यांचा माईक बंद करण्यात आला. आता तर त्यांची खासदारकीच ठरवून रद्द केली.
राहुल गांधी यांनी २० हजार कोटींची मालकी कोणाची, असा प्रश्न उपस्थित केला आहे. मात्र, त्याचे उत्तर केंद्र सरकार देत नाही. उलट लोकसभेत सभापती बिर्ला व राज्यसभेत जगदीप धनखड सभागृहच चालवू देत नाहीत, असा आरोपही त्यांनी केला.
कॉंग्रेसतर्फे मोठे जनआंदोलन
अदानी यांच्या भ्रष्टाचाराविरोधात आगामी काळात कॉंग्रेसतर्फे व्यापक जनआंदोलन उभारण्यात येणार असल्याची माहिती श्री. पाटील यांनी दिली. ते म्हणाले, ‘‘आम्ही प्रत्येक जिल्ह्यात, तालुक्यात, तसेच गावात मोठे आंदोलन करून जनतेला जागृत करणार आहोत.’’
बाजार समितीत महाविकास आघाडी : पवार
बाजार समिती निवडणुकीबाबत कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार म्हणाले, की बाजार समितीत आम्ही कॉंग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेची महाविकास आघाडी करणार आहोत. आमची तीच भूमिका आहे. सध्या आम्ही सर्व उमेदवारांना अर्ज भरण्यास सांगितले आहे.
अर्ज माघारीनंतर अधिकृत उमेदवार जाहीर करण्यात येतील. जिल्हा बँकेत कॉंग्रेसचेच सदस्य असलेल्यांना उमेदवार दिली आहे. ते कॉंग्रेसचे संचालक म्हणून निवडून आले आहेत. त्यांच्या कॉंग्रेस सदस्यत्वाचा आमच्याकडे पुरावा आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.