Jalgaon News : जळगाव जिल्ह्याला आदिवासी विकासासाठी 10 कोटींपेक्षा अधिकचा वाढीव निधी

जिल्ह्याच्या जिल्हा वार्षिक आदिवासी घटक कार्यक्रमासाठी मुळ तरतूद निधी पेक्षा अधिकचा निधी मिळावा म्हणून प्रयत्न केला होता.
fund
fund esakal
Updated on

Jalgaon News : जिल्ह्याच्या जिल्हा वार्षिक आदिवासी घटक कार्यक्रमासाठी मुळ तरतूद निधी पेक्षा अधिकचा निधी मिळावा म्हणून प्रयत्न केला होता. वित्त आणि नियोजन विभागाने याची दखल घेऊन १०.०८ कोटी एवढा वाढीव निधी मंजूर केला.

यासाठी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील आणि जिल्ह्यातील सर्व आमदारांनी यासाठी पाठपुरावा केला असल्यामुळे हा वाढीव निधी मिळाला. (Additional funds of 10 crore for tribal development to Jalgaon district news)

fund
Aditya Thackeray Jalgaon Daura : शिवसेना नेते आदित्य ठाकरे आज जळगाव जिल्हा दौऱ्यावर

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आभार व्यक्त केले आहेत.

जिल्हा वार्षिक आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत अतिरिक्त मागणी केलेल्या निधी मध्ये बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना, शिक्षण, महिला सशक्तीकरण, आरोग्य सेवा, पारधी विकास, महिला व बाल विकास, विद्युत विकास, लघु पाटबंधारे.

मागासवर्गीय कल्याण, पशुसंवर्धन, पाणी पुरवठा व स्वच्छता इत्यादी क्षेत्र येणार असून यासाठी दहा कोटी ८ लाख इतका वाढीव नियतव्यय उपलब्ध करून देण्यात आला आहे.

यामुळे जिल्ह्यातील आदिवासी भागातील विकासाला गती मिळणार असून आर्थिक उन्नतीस हातभार लागणार असल्याची भावनाही पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केली.

fund
Jalgaon News : वीज मंडळाच्या अधिकाऱ्यांना कार्यालयात कोंडले

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()