Adhik Maas 2023: अधिक मासात उजळली ‘कांस्य’कला! रावेरची दुर्मिळ ओळख जपणारी शेवटची पिढी

Various articles of wrought bronze metal
Various articles of wrought bronze metalesakal
Updated on

Adhik Maas 2023 : सध्या सुरू असलेल्या अधिक महिन्यात कांस्य धातूच्या भांड्यांचे विशेष महत्त्व आहे. या विविध वस्तू दान देण्याची परंपरा वैदिक धर्मात आहे.

या धातूपासून तयार झालेल्या वाट्या, दिवे, ताटे, पराती आदी वस्तू तयार करण्याचा दुर्मिळ व्यवसाय महाराष्ट्रात भंडाराशिवाय फक्त रावेर येथे असून, रावेरची ही दुर्मिळ ओळख जपणारी ही शेवटची पिढी आता कार्यरत आहे. (Adhik Maas 2023 Bronze art lit up last generation to preserve Ravers rare identity jalgaon)

विविध स्पर्धांत ‘कांस्यपदक’ दिले जाते, हे आपण ऐकतो. ८० टक्के तांबे आणि २० टक्के कथिल अत्युच्च तापमानात एकत्र करून हा धातू तयार केला जातो.

पॉलिश केल्यावर अगदी सोन्यासारख्या चमकणाऱ्या या धातूपासून तयार केलेल्या वस्तू विवाहात मुलीला भेट म्हणून देण्याची परंपरा आहे.

सध्या सुरू असलेल्या आधिक मासात जावयांना किंवा ब्राह्मणांना या काशाच्या वस्तू भेट किंवा दान म्हणून दिल्या जातात. विवाह कार्यक्रमात मधुपर्क पूजनात या काशाच्या भांड्यात मध घालून ते जावयाला देण्याची परंपरा आहे.

काशाच्या ताटात जेवणे हे आरोग्यासाठी महत्त्वाचे असल्याचे आयुर्वेदात सांगितले आहे. काशाच्या ताटात जेवण केल्याने आम्लपित्त, अपचन दोष दूर होतात, त्वचारोगापासून बचाव होतो, तसेच ते बुद्धिवर्धक, रुचिवर्धकही आहे.

शंभर वर्षांची परंपरा

सुमारे १०० वर्षांपूर्वी येथील कारागीर गल्लीतील गंभीर चौधरी यांनी धुळे जिल्ह्यातील सोनगीर येथून कांस्य धातू तयार करून त्याच्या विविध प्रकारच्या वस्तू तयार करण्याची कला आत्मसात केली.

पहाटे चारला उठणे आणि अत्युच्च तापमान, करावी लागणारी मेहनत पाहता या व्यवसायाकडे नव्या पिढीचे दुर्लक्ष झाले आहे. संपूर्ण महाराष्ट्रात भंडारा वगळता फक्त रावेर येथे ही भांडी तयार करण्याचा व्यवसाय चालतो.

सध्या येथे या गल्लीत प्रकाश रूपचंद चौधरी, सुधाकर विष्णू चौधरी आणि सुनील शांताराम चौधरी हे तिघेच हा व्यवसाय करतात. विष्णू चौधरी, मधुकर चौधरी त्यांना मदत करतात.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Various articles of wrought bronze metal
Dhule News: शहरात निकृष्ट कामे, पाणीही अद्याप गढूळच!

महाराष्ट्रभर बाजारपेठ

रावेर येथून काशापासून तयार केलेली भांडी पुणे, नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार, शहादा, शिरपूर, मालेगाव, सोनगीर येथे पाठविल्या जातात. ही कला सोनगीर येथून रावेरला आली; पण तिथे आता कोणी हा व्यवसाय करीत नाही.

रोज ४० किलो वस्तू निर्मिती

या कांस्य धातूपासून रोज सुमारे ४० किलो वजनाच्या वस्तू तयार करण्यात येतात. या वस्तू १९०० ते २००० रुपये किलो या दराने विक्री होतात.

पूर्वी तांबे आणि कथिल हे दोन्ही धातू इथेच एकत्र करून वस्तू तयार केल्या जात. आता कांस्य धातूचे छोटे-छोटे गोळे (कच्चा माल) इंदूर येथून आणण्यात येतो.

तप्त धातूवर घणाचे घाव

या धातूपासून पत्रा बनवून त्यापासून छोट्या-मोठ्या वाट्या, ताटे, पराती, दिवे, भजन-कीर्तनात वाजवायची झांज, मंदिरातील घंटा आदी वस्तू तयार केल्या जातात. पूर्वी यापासून देवदेवतांच्या मूर्तीही तयार होत.

पहाटे चारला भट्टी पेटवून त्यात या धातूच्या गोळ्याला दीड, दोन तास तापवून काहीसे मऊ केले जाते. मग हा तप्त धातूचा गोळा भट्टीबाहेर काढून एकाच वेळी पाच जण त्यावर घणाचे घाव घालून त्याला हवा त्या वस्तूचा आकार देतात.

ती वस्तू थंड झाल्यावर तिला आतून पॉलिश केले जाते आणि तिचे काठ कापले जातात. या तिन्ही कुटुंबांचा व्यवहार वेगवेगळा असला, तरी त्यांची एकी उल्लेखनीय असून, कामात एकमेकांना मदत करतात.

Various articles of wrought bronze metal
Nashik News: पानेवाडी सरपंचांविरुद्ध अविश्‍वास ठराव मंजूर अन सरपंच पवार झाले पदावरून पायउतार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.