Adhik Maas 2023 : गटारी अमावास्येनंतर अधिक मास सुरू झाला आहे. या मासाचे ‘स्वामी’ भगवान विष्णू आहेत. या महिन्यात केलेले धार्मिक कार्य व दानधर्मामुळे मोक्षप्राप्तीसह अधिक फलप्राप्ती होते. (adhik maas people preferring giving copper utensils to son in law jalgaon news)
हिंदू धर्मशास्त्रात मुलगी व जावयास लक्ष्मीनारायण स्वरूप मानले जाते. त्यामुळे जावयासह ब्राह्मण, देव, गुरू यांना दान देण्याला महत्त्व आहे. बदलत्या काळातही लेक-जावयाला वाण देण्यासाठी अद्यापही तांब्याच्या भांड्यांनाच पसंती देण्यात येते. यंदा तांब्याच्या दरात वाढ झाल्याने भांडीही महागली आहेत.
आधुनिक काळात जावयाला देण्यात येणाऱ्या भेटवस्तूंच्या स्वरूपात काहीसा बदल झाला असला, तरी अद्यापही तांब्याची भांडी व कपडे भेट देण्यास ‘अधिक’ पसंती दिली जात आहे. बाजारात वाण देण्यासाठी तांब्याचे ताम्हण, आकर्षक दिवे, नंदादीप, तबक, लोटा (तांब्या), घागर, नक्षीदार ताम्हण विक्रीसाठी आले आहे. त्यात तांब्याचे ताम्हण २०० रुपयांपासून ८०० रुपयांपर्यंत उपलब्ध आहे.
असे आहेत दर...
*तांब्याचे दिवे- २० रुपयांना १२ (लहान)
*तांब्याचे दिवे- १२० रुपयांना १२ (मध्यम)
*ताम्हण- ८० ते २५० रुपये प्रतिनग (आकारमानानुसार)
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
*गडवा (तांब्या)- ६० ते २५० प्रतिनग
*निरांजन- २० ते ८० रुपये प्रतिनग
*नंदादीप- ६० ते २०० रुपये प्रतिनग
*पाच तांब्यांच्या भांड्यांचा सेट- ५०० ते ५५०
तयार ड्रेसला मागणी
अधिक मासात इतर दानाबरोबरच कपडे दानासही मोठे महत्त्व आहे. त्यामुळे जावयास कपडे, तर मुलीला नवी साडी घेतली जाते. अलीकडे रेडिमेडचा काळ असल्याने तयार शर्ट-पँटसह अन्य खरेदीला पसंती देण्यात येते. त्यामुळे तयार कपड्यांच्या बाजारातही मोठा उत्साह आहे.
दीपदानाला महत्त्व
अधिक मासात अन्य दानाबरोबरच दीपदानाला मोठे महत्त्व आहे. त्यामुळे तांब्याचे लहान ते मोठे दिवे बाजारात वेगवेगळ्या आकारांत विक्रीसाठी दाखल झाले आहेत.
"तांबे किलोमागे १०० ते २०० रुपयांनी महागले आहे. यामुळे यंदा तांब्याच्या भांड्यांच्या दरात दहा टक्के वाढ झाली. जावयांना देण्यासाठी तांब्याच्या वस्तूंची खरेदी सुरू झाली आहे." - सतीश वाणी, तांबे भांडी विक्रेते
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.