Jalgaon News : रमाई आवासच्या 1845 घरकुलांना; पालकमंत्र्यांकडून प्रशासकीय मंजुरी

ramai awas yojna
ramai awas yojna sakal
Updated on

Jalgaon News : सामाजिक न्याय विभागातर्फे अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या स्वतःच्या हक्काचे घर उभारणीच्या स्वप्नाला पूरक असलेल्या रमाई आवास घरकुल या अत्यंत महत्त्वाकांक्षी योजनेतंर्गत जिल्ह्यात २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी १ हजार ८४५ घरकुलांना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रशासकीय मंजुरी दिली आहे.( Administrative approval for 1845 houses of Ramai Awas by Guardian Minister jalgaon news )

रमाई घरकुल आवास योजना ही एक अत्यंत महत्त्वाची आणि महत्त्वाकांक्षी राज्य पुरस्कृत योजना असून ज्यांना निवासाची व्यवस्था नाही अशा सर्व आर्थिक दुर्बल असणाऱ्या व सर्वसामान्यांना नागरिकांना स्वतःच्या जागेवरती राज्य सरकार पक्क्या स्वरूपाची घरबांधणीची व्यवस्था करून देत असल्याने ही योजना वरदान ठरत असल्याचे माहिती पालकमंत्री पाटील यांनी दिली.

या रमाई आवास योजनेत २०२३-२४ साठी जिल्ह्यासाठी ३ हजार ५६६ लाभार्थ्यांचे उद्दिष्ट होते. त्यापैकी १ हजार ८४५ लाभार्थ्यांना मंजुरी मिळाली आहे. यामध्ये मातंग समाजातील १४२ व मातंग समाज वगळून इतर अनुसूचित जाती १ हजार ७०३ घरकुलांना मंजुरी देण्यात आली आहे.

मंजूर करण्यात आलेल्या अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील आर्थिक दुर्बल कुटुंबांचे स्वतःच्या हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी रमाई आवास योजनेच्या माध्यमातून पात्र असलेल्या प्रत्येकाला या योजनेचा लाभ देण्याचा आमचा प्रयत्न आहे.

भविष्यात या उद्दिष्टात आणखी वाढ करण्यात येईल व या योजनेस कुठेही निधीची कमतरता भासणार नाही. यासाठी मी सातत्याने प्रयत्नशील असल्याचेही पालकमंत्री पाटील यांनी सांगितले.

ramai awas yojna
Jalgaon News : आधी दिवाळ आदिवासी पाड्यांवर..मग घरचा उत्सव : डॉ. रितेश पाटील

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक राजू लोखंडे यांनी रमाई आवास योजनेचा जिल्ह्यातील प्रगतीचा वेळोवेळी आढावा घेतला आहे.

तालुका निहाय मंजूर घरकुले

तालुका- घरकुले

जळगाव - १२७

धरणगाव - ११७

अमळनेर -३२

चाळीसगाव -२२६

पाचोरा-२५

भडगाव-३८

एरंडोल-८१

पारोळा- ४३१

भुसावळ--४९

जामनेर-१४१

चोपडा- ८०

मुक्ताईनगर-२५२

बोदवड-११४

रावेर- ९२

यावल -४०

ramai awas yojna
Jalgaon News: एरंडोल पालिकेत आमदार पाटील पिता-पुत्रांची दडपशाही; प्रत्येक कामात मक्तेदाराकडून टक्केवारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.