Engineering Diploma Admission : अभियांत्रिकी डिप्लोमाच्या प्रवेशाची या तारखेपर्यंत मुदतवाढ

 engineering admission
engineering admissionesakal
Updated on

Engineering Diploma Admission : अभियांत्रिकी डिप्लोमाच्या प्रवेशाची मुदत आता ३० जूनपर्यंत वाढविण्यात आली आहे.

याबाबत राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी याबाबतचे आदेश शिक्षण विभागाला दिले असल्याची माहिती आमदार चंद्रकांत पाटील यांनी दिली.

दरम्यान, या निर्णयामुळे विद्यार्थ्यांसह पालकांना दिलासा मिळाला आहे.( admission deadline for Diploma in Engineering has now been extended till June 30 jalgaon news)

त्यातच बुधवारी अभियांत्रिकी डिप्लोमाच्या विद्यार्थ्यांचा प्रवेश घेण्याचा शेवटचा दिवस होता. मात्र, दाखले मिळत नसल्याने विद्यार्थी व पालक हवालदिल झाल्याची माहिती पडताच मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी उपविभागीय अधिकारी भुसावळ व उप विभागीय अधिकारी फैजपूर यांच्याशी चर्चा केली असता त्यांनीही महाऑनलाइन पोर्टल सर्व्हर डाऊन असल्यामुळे नाईलाज असल्याचे त्यांनी सागितले.

आमदार पाटील यांनी लागलीच राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी भ्रमणध्वनीवरून चर्चा करून विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी डिप्लोमा प्रवेशासंबंधी दिलासा मिळावा, अशी विनंती केली असता मंत्री चंद्रकांत पाटील यांनी तातडीने उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या सचिवांना कॉन्फरन्सवर घेऊन तातडीने डिप्लोमा प्रवेशाची मुदत ३० जूनपर्यंत वाढविण्यात आल्याचे सांगितले. आमदार पाटील यांनी लागलीच मंत्री पाटील यांचे आभार मानले.

 engineering admission
Career Planning: दहावीनंतरच्या करिअरसाठी 'हे' आहेत १० बेस्ट पर्याय

इयत्ता दहावी, बारावीचे निकाल लागले आहेत. पुढील शैक्षणिक प्रवेशासाठी त्यांना जात प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलेयर व अन्य दाखल्यांची गरज पडते. पण, दाखले देण्यासाठी महाऑनलाइन पोर्टल सर्व्हर डाऊन असल्यामुळे कामकाज होत नव्हते. हे सर्व्हर १७ जूनपासून हळूहळू बंद पडण्याच्या मार्गावर होते. मंगळवारी ते पूर्णपणे ठप्प झाले.

दरम्यान, अभियांत्रिकी डिप्लोमा प्रवेशासाठी ३० जूनपर्यंत मुदत वाढल्याने राज्यातील विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी ३० जूनपर्यंत उर्वरित प्रवेशासाठी आवश्यक दाखल्यांची पूर्तता करावी, असे आवाहन आमदार चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.

 engineering admission
Engineer Recruitment : मुंबई पालिकेत अभियंत्यांची भरती करणार; इंजिनिअर्स युनियनच्या मागणीला मंजूरी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.