Jalgaon : आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे पाल्य दत्तक; ‘भरारी’चा उपक्रम

Bharari Foundation Rotary office bearers with children of suicidal farmers.
Bharari Foundation Rotary office bearers with children of suicidal farmers.esakal
Updated on

जळगाव : भरारी फाउंडेशन, रोटरी क्लब ऑफ जळगाव सेंट्रल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात जिल्ह्यातील आत्महत्या (suicide) केलेल्या शेतकऱ्यांच्या पाल्यांना शिक्षणासाठी दत्तक (Adoption) घेण्याचा भावस्पर्शी कार्यक्रम आज झाला.

पारोळा, अमळनेर, धरणगाव, भडगाव, पाचोरा, चोपडा, रावेर या तालुक्यातील शेतकऱ्यांच्या १०३ पाल्यांना मोफत शैक्षणिक साहित्य व वार्षिक फी वाटप करण्यात आली. (Adoption of children of suicidal farmers activity of Bharari Jalgaon Latest Marathi News)

Bharari Foundation Rotary office bearers with children of suicidal farmers.
Nandurbar : जिल्ह्यात शस्त्रबंदी, जमावबंदी आदेश जारी

शेतकरी संवेदना
फाउंडेशनतर्फे राबविण्यात येणाऱ्या ‘शेतकरी संवेदना’' या अभियानांतर्गत घेण्यात येणाऱ्या या उपक्रमाचे हे ८ वे वर्ष असून आतापर्यंत संस्थेने ३५० विद्यार्थ्यांना प्राथमिक व माध्यमिक शिक्षणासाठी दत्तक घेतले आहे. तसेच दि गार्डियन्स फाउंडेशनतर्फे या मुलांच्या उच्च शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली आहे.

पुनर्वसनासाठी प्रयत्न

पोलिस मुख्यालयातील मंगलम्‌ हॉल येथे झालेल्या या कार्यक्रमात खासदार उन्मेष पाटील यांनी सामाजिक बांधिलकी जपून शेतकरी आत्महत्यासारख्या संवेदनशील बाबीवर काम करत असलेल्या भरारी फाउंडेशनचे कौतुक केले.

वेगा केमिकलतर्फे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांच्या पुनर्वसनासाठी शाश्वत प्रकल्पासाठी सर्वतोपरी करण्याचे भालचंद्र पाटील यांनी सांगितले. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाधिकारी अभिजित राऊत, पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, कृषी उपसंचालक अनिल भोकरे, उद्योजक रजनीकांत कोठारी, रोटरी सेंट्रलचे अध्यक्ष विपुल पारेख रोटरी सेंट्रलचे प्रकल्प संचालक कल्पेश दोशी, प्रांतपाल मोहन पालेशा पुणे, आदी उपस्थित होते.

Bharari Foundation Rotary office bearers with children of suicidal farmers.
हरिहर गड १७ जुलैपर्यंत पर्यटकांसाठी बंद; वनविभागाचा निर्णय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.