Jalgaon News: ‘बालकल्याण’च्या ‘त्या’ सदस्यांना बरखास्त करा : ॲड. रोहिणी खडसे

Adv Rohini Khadse statement Dismiss  members of Child Welfare jalgaon news
Adv Rohini Khadse statement Dismiss members of Child Welfare jalgaon news
Updated on

Jalgaon News : खडके बद्रुक (ता. एरंडोल) येथील बालसुधारगृहातील मुलींवर झालेल्या अत्याचारप्रकरणी जिल्हा बालकल्याण समितीच्या अध्यक्षांसह तीन सदस्यांवर ‘पॉक्सो'अंतर्गत गुन्हा दाखल आहे.

तरीही ते समितीत सदस्य म्हणून कार्यरत आहेत. त्यांना तातडीने बरखास्त करण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) च्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष ॲड. रोहिणी खडसे यांनी केली. (Adv Rohini Khadse statement Dismiss members of Child Welfare jalgaon news)

जळगाव येथील त्यांच्या निवासस्थानी पत्रकारांशी बोलताना ॲड. खडसे म्हणाल्या, की खडके बुद्रुक येथील बालसुधारगृहातील तीन मुलींचे लैंगिक शोषण झाल्याचे प्रकरण उघडकीस आले होते.

मुलींनी तक्रार करूनही हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी बालकल्याण समितीच्या अध्यक्षा देवयानी गोविंदवार (रा. रायसोनीनगर, जळगाव), सदस्या विद्या बोरनारे (भगवाननगर, जळगाव), सदस्य संदीप पाटील यांच्याविरुद्ध पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला. मात्र अध्यक्षांसह तीन सदस्य अद्याप या समितीत कार्यरत आहेत. गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांना ताबडतोब बरखास्त करण्याची गरज होती.

Adv Rohini Khadse statement Dismiss  members of Child Welfare jalgaon news
Eknath Khadse: खडसेंचे जावई गिरीश चौधरी यांना दिलासा; मिळाली 'ही' महत्वाची परवानगी

एवढेच नव्हे, तर आता हे प्रकरण दाबण्यासाठी हे सदस्य त्या लैंगिक शोषण झालेल्या मुलीवर दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्यावर कारवाई का केली जात नाही? त्यांच्यावर कुणाचा वरदहस्त आहे? पालकमंत्री याबाबत का लक्ष देत नाहीत? असे प्रश्‍न आहेत.

जिल्हाधिकारी म्हणतात, वरून आदेश

जिल्हा बालकल्याण समितीच्या सदस्यांवर गुन्हे दाखल असल्याने त्यांना समितीतून बरखास्त करण्याची कारवाई होणे आवश्‍यक आहे. याबाबत आम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली असता, त्यांनी या प्रकरणी वरून दबाव येत आहे, असे सांगितले. त्यामुळे कारवाई करण्यास वरून दबाव कोण आणत आहे? याचाही खुलासा व्हावा, अशी मागणी ॲड. खडसे यांनी केली.

Adv Rohini Khadse statement Dismiss  members of Child Welfare jalgaon news
Rohini Khadse News : खारुताईला रोहिणी खडसेंनी दिले जीवदान; व्हिडिओ व्हायरल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.