मुक्ताईनगर : राज्याच्या गृह खात्याची लक्तरे वेशीवर टांगणारी घटना नांदेड जिल्ह्यात घडली असून, सहा वर्षीय चिमुकलीला न्याय मिळण्यासाठी सरकारने जलदगती न्यायालयात खटला चालवून दोषींवर कठोर कारवाई करावी.
अशी मागणी राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्ष ॲड. रोहिणी खडसे यांनी केली आहे. (Adv Rohini Khadse statement government prosecute 6 year old child in fast track court and take strict action against culprits jalgaon crime news)
नांदेड जिल्ह्यातील रोही पिंपळगाव (ता. मुदखेड) येथे एका सहा वर्षीय चिमुकलीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार करून निर्घृण हत्या करण्यात आल्याचे वृत्त आहे.
दोन जण भरदिवसा येतात आणि एका बालिकेला पळवून नेतात, ही घटना घडली. यावरून पोलिस प्रशासनाचा धाक संपल्याचे निदर्शक आहे. या संतापजनक घटनेमुळे शाहू, फुले आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्राची प्रतिमा खालावली आहे.
चोवीस तास केवळ विरोधकांना नामोहरम करण्यासाठी प्रशासन राबविण्यापेक्षा गृहमंत्री महोदयांनी या घटनेकडे गांभीर्याने पाहावे.
घटनेची युद्धस्तरावरून चौकशी करून दोषी आरोपींना तत्काळ अटक करावी, फास्ट ट्रॅक कोर्टात हा खटला चालवून दोषींना लवकरात लवकर फाशीची शिक्षा व्हावी, यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी केली आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा प्रांजली रावणगावकर या घटनेचा पाठपुरावा करीत आहेत.
त्यांनी त्या दुर्दैवी बालिकेच्या माता-पित्यांची भेट घेऊन संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यांचेसोबत असल्याची ग्वाही दिली आहे. या मुलीला न्याय मिळेपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही, असे रोहिणी खडसे यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.