चाळीसगावला खानदेशातील अत्याधुनिक जिनिंग; शेतकऱ्यांना रांगेत वाहन लावण्याची गरज नाही

Cotton Crop
Cotton Cropesakal
Updated on

चाळीसगाव : खानदेशातील अत्याधुनिक यंत्रसामुग्री असलेली पहिली कापूस जिनिंग ॲन्ड प्रेसिंग येथील उमंग व्हाइट गोल्ड प्रायव्हेट लिमीटेड या कंपनीने चाळीसगावात सुरु केली आहे. खासदार उन्मेष पाटील यांच्या प्रेरणेने सुरु झालेल्या या अत्याधुनिक जिनिंगमध्ये शेतकऱ्यांनी त्यांचा कापूस येथे विक्रीला आणल्यानंतर इतर ठिकाणी रांगेत वाहने लावतात, तशी वाहने लावण्याची गरज या ठिकाणी राहणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या वेळ आणि श्रमाची बचत होणार आहे.

परिसरातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी कंपनीने सर्व सोयी सुविधायुक्त अत्याधुनिक जिनिंग कन्नड रस्त्यावरील रांजणगाव शिवारात सुरु केली आहे. तिचा शुभारंभ आज सकाळी अकराला कपाशीच्या गाडीचे काटापूजन करुन करण्यात आला. याप्रसंगी खासदार उन्मेष पाटील यांचे वडील तथा दरेगावचे माजी सरपंच भैय्यासाहेब पाटील, ग्रामसेवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संजीव निकम, उमंग व्हाइट गोल्ड कंपनीचे संचालक प्रशांत वाघ, ‘सीसीआय’चे श्री. चोपडे, प्रमोद पाटील, देवगिरी बँकेच्या चाळीसगाव शाखेचे व्यवस्थापक जीवन राजूरकर, पंचायत समितीचे उपसभापती भाऊसाहेब पाटील, टेकवाडेचे सरपंच वाल्मिक पाटील, रांजणगावचे शेखर निंबाळकर, दहिवदचे सरपंच नवल पवार, पंचायत समितीचे माजी सदस्य रवींद्र चौधरी, बाणगावचे सरपंच संजय परदेशी, खेर्डेचे सरपंच नंदकुमार पाटील, पैठणी उद्योजक माधव रणदिवे, भरत राठोड, सुदाम चव्हाण, नरेंद्र जैन, उद्योजक समकित छाजेड, रवी राजपूत, लोणजे ग्रामपंचायतीचे सदस्य संदीप राठोड, अनिल चव्हाण आदी उपस्थित होते.

Cotton Crop
Fake Pesticides : बनावट कीटकनाशकांनी जिल्ह्यात शेतकरी हैराण!

वेळ, श्रमाची बचत

कापूस उत्पादकांनी त्यांचा कापूस जिनिंगवर आणल्यानंतर अनेकदा काटा करण्यापासून ते कापूस गाठी तयार करण्यासाठी यंत्रावर नेण्यापर्यंत लांबच लांब रांगा लागतात. या ठिकाणी मात्र अत्याधुनिक यंत्रसामुग्री उपलब्ध असल्याने कापूस आणल्यानंतर तो एकदा का काट्यावर मोजून झाला की त्यापासून गाठी तयार करण्याची प्रक्रिया ऑटोमॅटिक होणार आहे. त्यामुळे कमी मजुरांवर या जिनिंगमध्ये कापसाच्या गाठी तयार होतील. परिसरातील शेतकरी व व्यापारी बांधवांकडून पहिल्याच दिवशी कापूस खरेदीला भरघोस प्रतिसाद लाभला. तालुक्यातच आता कापूस विक्रीची सोय उपलब्ध झाल्याने कापूस उत्पादक शेतकरी व व्यापाऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

Cotton Crop
नाशिकच्या शेतकरी कंपनीला मिळाला पहिल्या खासगी बाजार समितीचा मान

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.