वावडे (जि. जळगाव) : बारावीची परीक्षा (HSC Exam) सुरू होऊन तीन दिवस झाल्यानंतर तालुक्यात कॉपीमुक्त अभियान कागदावरच उरले असल्याचे वास्तव समोर येत आहे. (after 3 days of 12th exam start fact that copy free campaign in taluka has remained on paper is coming to fore jalgaon news)
परीक्षा केंद्रावर केंद्र संचालकांचे मर्जीने सामूहिक कॉपी होत असून, ४० गुणांपर्यंतची रसद शिक्षकच पुरवत असल्याची बाब काही केंद्रावर सुरू असल्याची चर्चा आहे.
तालुक्यात सध्या बारावीची परीक्षा सुरू आहे. भाषेचे तीन पेपर आटोपले आहेत. यावेळी शिक्षण व महसूल विभागाने बारावीची परीक्षा कॉपीमुक्त अभियानानुसार कॉपीमुक्त होईल, यासाठी जनजागृती केली होती. मात्र, प्रतीक्षा परीक्षा सुरू झाल्यानंतर परीक्षा केंद्र बाहेर सामसूम मात्र परीक्षा केंद्रात कॉपीमुक्त अभियानाला फटाके अशी गत अनेक केंद्र सुरू असल्याचा आरोप होत आहे.
पाच वर्षापासून तालुक्यात परीक्षा केंद्रांची संख्या वाढली आहे. दीडशेवर परीक्षार्थी असतील तर संबंधित शिक्षण संस्थेतच परीक्षा केंद्र दिले गेले आहे. मुख्य म्हणजे त्याचं शिक्षण संस्थेतील शिक्षकावर केंद्र संचालकाची जबाबदारी दिली गेली आहे.
हेही वाचा : ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!
यामुळे अनेक परीक्षा केंद्रावर कॉपीमुक्त अभियान कागदावरच उरले आहे. महसूल विभागाच्यावतीने केंद्राबाहेर बैठ्या पथकाची सोय केली गेली आहे. हे बैठे पथक शाळेच्या दरात आपले कर्तव्य बजावत आहे. मात्र केंद्रात सर्रास कॉपीमुक्त अभियानाला फटाके लावले जात असल्याचे चित्र समोर येत आहे.
भरारी पथके नेमकी कशासाठी?
शिक्षण विभागाच्यावतीने परीक्षा केंद्रावरील अनियमितेतला आळा घालण्यासाठी भरारी पथके कार्यान्वित केली गेली आहेत. मात्र परीक्षा केंद्रावर भरारी पथक येण्याआधीच परीक्षा केंद्र अलर्ट कसे होते? एक कोडे आहे. भरारी पथकाचे लोकेशन परीक्षा केंद्रबाहेरही चर्चेतून समोर येत असेल तर झाली ती शुक्राचार्यांनीच कॉपीमुक्त अभियानाला फटाके लावण्याचे काम केल्याचा आरोप होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.