Jalgaon News : कोळी बांधवांचे झाडावर लटकून आंदोलन

कोळी बांधवांनी झाडाला लटकून आंदोलन करीत जिल्हा प्रशासनासह लोकप्रतिनिधींची लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.
While hanging from a tree and protesting, tribal
While hanging from a tree and protesting, tribal esakal
Updated on

Jalgaon News : आदिवासी टोकरे कोळी जमातीला जातीचे प्रमाणपत्र त्वरित मिळावे यासह विविध मागण्यासाठी गेल्या बारा दिवसांपासून आदिवासी कोळी बांधवांनी बेमुदत उपोषण सुरू केले आहे.

त्याची अद्यापही दखल घेतली गेले नसल्याने कोळी बांधवांनी झाडाला लटकून आंदोलन करीत जिल्हा प्रशासनासह लोकप्रतिनिधींची लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.

येथील शिवतीर्थ मैदानावर गेल्या बारा दिवसांपासून आदिवासी टोकरे कोळी बांधवांचे उपोषण सुरू झाले आहे.

आंदोलनकर्ते प्रा.भाऊसाहेब सोनवणे यांनी सांगितले, की जर का आमच्या आदिवासी टोकरे कोळी जमातीला जातीचे प्रमाणपत्र सुलभरीत्या दिले नाहीतर येणाऱ्या काळात संपूर्ण महाराष्ट्रात वणवा पेटेल.

जिल्ह्यातील तिन्ही मंत्र्यांना बारा दिवसापासून भेट द्यायला आलेली नाही. मग यांना फक्त आदिवासी टोकरे कोळी बांधव यांचे मतदान निवडणुकीला चालते.

While hanging from a tree and protesting, tribal
Jalgaon District Hospital : जिल्हा रूग्णालयाचे रूप पालटतेय; विशेष नवजात शिशू काळजी कक्ष

मग जेव्हा टोकरे कोळी बांधवांना न्याय देण्याची वेळ येते तेव्हा पळ काढला जातो.

आदिवासी विकास मंत्री यांनी टोकरे कोळी जमातीला संपविण्याची सुपारी घेतली आहे, असा आरोप प्रा. सोनवणे यांनी केला आहे.

यावेळी बबलू सपकाळे, भगवान सोनवणे, शुभम सोनवणे, प्रल्हाद सोनवणे, भरत पाटील, ऍड.गणेश सोनवणे, दीपक सोनवणे समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

While hanging from a tree and protesting, tribal
Jalgaon News : रिक्त जागा भरून घेण्यासाठी लवकरच ‘स्पॉट राउंड'; ‘आयुष’ सकारात्मक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.