Jalgaon : कृषी विभागाच्या पथकाची कारवाई; एकाविरुद्ध गुन्हा दाखल

Agriculture Department
Agriculture Departmentesakal
Updated on

भुसावळ : पिंपळगाव बुद्रूक (ता. भुसावळ) येथे नितीनचंद बन्सीलाल जैन यांच्या कृषी केंद्रावर कृषी विभागाच्या संयुक्त भरारी पथकाने शुक्रवारी (ता. ७) छापा टाकला. या वेळी केंद्रावर विनापरवाना मुदतबाह्य कीटकनाशक साठा आढळून आला.

या प्रकरणी वरणगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून ५ लाख ८७ हजार ४९५ रुपयांचा कीटकनाशकाचा साठा जप्त केला आहे.

कृषी विभागाच्या पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीवरून संयुक्तपणे तपासणी केली असता जैन यांच्या सर्वे क्रमांक २३९, घर क्रमांक ७४४ व ७४५ या ठिकाणी विनापरवाना, मुदतबाह्य कीटकनाशकांचा साठा अनधिकृतपणे साठवणूक व विक्री करत असल्याचे आढळून आले.

या प्रसंगी संशयित नितीनचंद जैन यांच्याकडील साठा जप्त करून त्याची मोजदाद व पंचनामा पंचांसमक्ष करण्यात आला. नाशिकचे कृषी सहसंचालक मोहन वाघ, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर व कृषी विकास अधिकारी वैभव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हास्तरीय गुणवत्ता नियंत्रण पथकाने मोहीम अधिकारी विजय पवार, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक अरुण तायडे, तालुका कृषी अधिकारी अभिनव माळी, गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक धीरज बडे, विस्ताराधिकारी कपिल सुरवाडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.(Agriculture department action case has been registered against one Jalgaon News)

Agriculture Department
तुम्ही घ्या पगार अन् आम्ही खातो शिव्या ! महासभेत सुस्त प्रशासना वर नगरसेवकांची आग

या वेळी वरणगाव पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक आशिष अडसूळ व उपनिरीक्षक परशुराम दळवी, पोलिस कर्मचारी मनोहर पाटील, प्रशांत ठाकूर हे उपस्थित होते. वरणगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, या कारवाईमध्ये एकूण ५ लाख ८७ हजार ४९५ रुपयांचा कीटकनाशकाचा साठा जप्त केला आहे.

विनापरवाना, मुदतबाह्य व अवैध कीटकनाशकांची विक्री होत असल्याचे आढळून आल्यास त्यांच्याविरोधात कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. शेतकऱ्यांची अशा पद्धतीने कोणीही फसवणूक करू नये. अशा प्रकाराकडे कृषी विभागाचे लक्ष असून भरारी पथकाच्या माध्यमातून कारवाई सुरू राहणार आहे.

- मोहन वाघ

विभागीय कृषी सहसंचालक, नाशिक विभाग, नाशिक.

Agriculture Department
Jalgaon : दहा हजारांच्या वसुलीवरुन मित्रानेच सौरभचा गळा चिरला!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.