Jalgaon News : तृणधान्यातून सकस आहार घेण्याचे विद्यार्थ्यांना धडे; कृषी विभागाचा पुढाकार

cereals
cerealsesakal
Updated on

दिनेश वाणी : सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : सोशल मिडीया, फास्टफुडच्या युगात विद्यार्थ्यांच्या हातात पुस्तकाऐवजी मोबाईल आणी भोजनात सकस आहाराऐवजी बर्गर, पिझ्झाचा सामावेश होत आहे. यामुळे बालकांपासून युवा वर्गांत विविध आजारांची लागण झाली आहे.

विद्यार्थ्यांना बालपणापासूनच आहारात पौष्टीक तृणधान्य मिळाले आणि तेच खाण्याची सवय लागली, तर भावीकाळातील युवा पिढी सुदृढ तयार होईल.

या उद्देशाने जिल्हा अधिक्षक कृषी विभागातर्फे शाळांमध्ये जावून विद्यार्थ्यांच्या मनावर पौष्टीक तृणधान्याचा आहार घेण्याचे बिंबविले जात आहे. (Agriculture Department initiative to teach students to eat healthy food from cereals jalgaon news)

कृषी विभागाचा हा अभिनव उपक्रम बालकांपासून युवकांना सकस आहार घेण्याकडे प्रवृत्त करणारा ठरत आहे. या उपक्रमांचे सर्वत्र स्वागत होत आहे. गतीमान युगात सोशल मिडीयाचा मोठा प्रभाव लहान विद्यार्थ्यांवर होत आहे.

पुस्तकांऐवजी, तसेच प्रत्यक्ष मैदानावर जावून खेळण्याऐवजी लहान मुले मोबाईल आणि व्हिडीओ गेममध्ये अडकल्याचे चित्र आहे. याचा विपरीत परिणाम डोळ्यांवर आणी शारीरीक वाढीवर होत आहे. लहान वयातच ४० टक्के विद्यार्थ्यांना चष्मा लागून विविध विकार जडल्याचे तज्ज्ञ सांगतात.

पौष्टीक तृणधान्याचे असे आहेत लाभ

* कॅल्शिअमची शरिरातील मात्रा वाढते

* मधूमेह, गुडघेदूखी कमी होते

* हाडांतील वंगण वाढते

* पोट साफ राहून दिवसभर ताजेतवाने वाटते

* बी. पी., शुगर नियंत्रणात ठेवण्यास मदत होते

* हाडे मजबूत होतात.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

cereals
Jalgaon Banana Crop : वरखेडेची केळी थेट सौदी अरेबियात! 200 क्विंटल शेतमाल रवाना

जेवण घेताना व्हिटीमीन, कॅल्शिअम असणारे खाद्य खाण्याऐवजी फास्टफूडकडे मुले वळतात. यामुळे हाडांचा ढिसूळपणा, ॲसिडीटी, नेत्रविकार, हृदयविकार आतापासूच जडत आहेत.

किमान मुलांची उंची वाढावी, त्याची शारीरीक क्षमता वाढावी यासाठी त्यांना सकस आहार कोणता, त्यांनी काय खावे? काय खावू नये? याबाबत सूक्ष्म पद्धतीने त्यांच्या मनावर बिंबवल्यास ते पौष्टीक तृणधान्य (ज्वारी, बाजरी, नाचणी, नागली, राळा)यापासून तयार केलेली भाकरी, बिस्कीट, चॉकलेट खातील.

परिणामी, त्यांना संभाव्य व्याधी होणार नाहीत. म्हणून जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयातर्फे जिल्ह्यातील कृषी विभागाच्या माध्यमातून गावागावातील शाळांमध्ये जावून पौष्टीक तृणधान्याची माहिती दिली जात आहे. विशेष म्हणजे लहान मुलेही आता पौष्टीक तृणधान्यापासून बनविलेले पदार्थच पाहिजे, असा आग्रह पालकांकडे धरीत आहेत. असेच उपक्रम वर्षभर शाळांमध्ये सुरू राहिल्यास विद्यार्थ्यांना पौष्टीक तृणधान्याची आवड निर्माण होवून, या धान्याला अधिक मागणी होईल.

"जिल्ह्यातील सुमारे चारशे ते पाचशे शाळांमध्ये जावून पौष्टीक तृणधान्य शरीराला कसे उपयोगी आहे, त्याबाबत विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबविले आहे. अनेक विद्यार्थ्यांना पौष्टीक तृणधान्याचे महत्व कळाले. त्यांनी फास्टफुड खाणे सोडले आहे. पालकांनीही बालकांना पौष्टीक तृणधान्यापासून बनविलेले पदार्थ देवून सकस आहार द्यावा." -संभाजी ठाकूर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी.

cereals
Inspirational News : देशभरात हजार गावांतील १ कोटी लोकांना धान्य; स्वातंत्र्यदिनी रॉबिनहूड आर्मीचे ‘मिशन स्वदेश

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.