Agriculture Innovation : ट्रॅक्टरप्रमाणे शेतकऱ्याच्या हाती देणार ड्रोन

Agriculture Innovation
Agriculture Innovation esakal
Updated on

जळगाव : एरोनॉटिकल्समध्ये उच्चशिक्षण प्राप्त तरुणाने शेतकऱ्यांच्या समस्यांवर संशोधन करत ‘रॉकेट सायन्स’कडे न वळता थेट ‘माझा शेतकरी जगला पाहिजे अन् तोही तंत्रज्ञानाच्या शिदोरीवर’ असा उदात्त विचार बाळगत थेट कृषी उडान ड्रोनच्या कंपनीच स्थापन केली.

पुणेस्थित या कंपनीने महाराष्ट्रासह देशभरात ड्रोनद्वारे शेतीची ब्लू प्रिंटच आखली असून, कोणत्या पिकावर कुठला रोग येतोय, त्याला कोणते पोषकद्रव्ये हवे आहेत.

पिकवाढीवर नियंत्रण ठेवणारे उच्च तंत्रज्ञानाने सुसज्ज कृषिड्रोन शेतीसाठी उपलब्ध करून दिले आहे.(Agriculture Innovation Like Tractor Drones also handed over to farmers Jalgaon News)

Agriculture Innovation
Jalgaon : तरुणाचा तलावात बुडून मृत्यू

भारत हा कृषिप्रधान देश आहे. देशाचे संपूर्ण अर्थचक्रच कृषी उत्पादनांवर अवलंबून असल्याने कृषी क्षेत्रात तंत्रज्ञानाचा प्रचंड वापर वाढला आहे. आता मात्र खेड्या-पाड्यात शेतशिवारात ड्रोनद्वारे पिकांवर फवारणी होताना दिसली तर नवल नको.

एम. जे. कॉलेज मैदानावर आयोजित कृषी प्रदर्शनात कृषिड्रोन निर्मात्या कंपनीचा संस्थापक तरुण अभियंता सारंग माने यानी शेतकऱ्यांना ‘कृषी उडान ड्रोन’ संदर्भातील उपयोगिता, तंत्रज्ञान आणि कृषी क्षेत्रासाठी होणारे लाभ याबाबत विस्तृत माहिती दिली.

ड्रोनचा शेती व्यवसायात वापर करण्याबाबत केंद्र सरकारने पुढाकार घेतला आहे. त्यासाठी कृषी उडान योजनेंतर्गत प्रशिक्षणासह सुलभ हप्त्यांवर ड्रोन उपलब्ध होऊ शकणार आहे. या ‘कृषी उडान ड्रोनद्वारे’ पिकांवर हव्या त्या उंचीवर द्रवरूप खते, कीटकनाशके फवारणी करून त्यांची योग्य ती निगा राखता येणे सहज शक्य आहे.

शेती व्यवसायात अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराने वेळ आणि पैशांची बचत व्हावी, शिवाय कष्टही कमी करण्याच्या हेतूने कृषी उडान ड्रोनद्वारे शेतीवर भर दिला जाणे आता काळाची गरज बनली आहे. याचाच एक भाग म्हणून जळगावात आयोजित कृषी प्रदर्शनात शेतकऱ्यांना ड्रोन शेतीविषयी प्रात्यक्षिक देण्यात आले. या अत्याधुनिक तंत्रज्ञानाची जिल्ह्या‍यातून आलेल्या शेतकऱ्यांसह, उच्चशिक्षित प्राध्यापक, अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी माहिती जाणून घेतली.

Agriculture Innovation
Crime Case : 3 लाखाची फसवणूक करणाऱ्या एकावर गुन्हा दाखल

भू-मातेचे फेडतोय पांग

पुणे विद्यापीठांतर्गत एमआयटी पुणे येथून बी-टेक ऐरोस्पेसचे उच्‍चशिक्षण प्राप्त करून सारंग श्रीमंत माने या अवघ्या वीस वर्षांच्या तरुण शास्त्रज्ञाने एरोनॉटिक्स अन् स्पेस रिसर्चमध्ये संधी असताना मातीचे पांग फेडण्याचा हेतू बाळगत शेती आणि ग्रामीण भागातील शेतकऱ्याला येणाऱ्या अडीअडचणींवर अहोरात्र संशोधन केले. शेतकऱ्याला पीक-पाण्यासहीत फवारणी, पिकांची निगा राखण्यासाठी येणाऱ्या अडचणींचा शास्त्रोक्तपद्धतीने अभ्यास करून ‘कृषी उडान ड्रोन’ निर्मितीचा चंग बांधत एप्रिल-२१ मध्ये कोथरूड (पुणे) येथे कृषिड्रोन निर्मितीसाठी कॅस्पर ड्रोनोटिक्स प्रा. लि या नावाने कारखाना स्थापन करून अवघ्या काही महिन्यांतच पुणे- नाशिक-नागपूर जिल्ह्या‍त आपल्या बहुपयोगी अत्याधुनिक ड्रोन शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिले आहे.

पाच ते सात मिनिटांमध्ये एकरभर फवारणी

सारंग माने, विशाल पाटील, प्रणव राजपूत यांनी ड्रोनच्या तांत्रिक बाबींविषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. ड्रोन शेतीचे फायदेही सांगण्यात आले. ड्रोनद्वारे ५ ते ७ मिनिटांमध्ये एक एकराचे क्षेत्र फवारणी होणार असल्याने वेळेसह कष्टामध्येही बचत होणार आहे. या ड्रोनद्वारे पावडर, धूर, स्प्रींकलर अशा विवीध प्रकारे औषधी,कीटकनाशकांची फवारणी लिलया करता येते.

असे आहे कृषिड्रोन

कॉन्फीग्रेशन- हेक्झाकॉपर, २५ किलोपर्यंत वजन घेऊन उडण्याची क्षमता, जीपीएस सिग्नल यंत्रणा, वेग प्रतिसेकंद ८ किमी, ४-जी कनेक्टिव्हिटी, १३ इंच प्रॉपेलर साईज, बॅटरी क्षमता ४४,०००MAH(22.V), बॅटरी टाइप-लिथीयम आयन, बॉडीमटेरियल-कार्बन फायबर व ऐबीएस, स्मार्ट बॅटरीचे आयुष्य-९०० चार्जेस, ड्रोनरेंज- २ किमी, पीक पाहणीसाठी हाय रिझ्युलेशन कॅमेरा, फ्लाइट-पॅथ प्लॅनिंग सिस्टम आणि सर्वांत महत्त्वाचे दुरुस्ती करण्यायोग्य तंत्रज्ञानाचा यात वापर करण्यात आला आहे.

तंत्रज्ञानातून रोजगारनिर्मिती

साधारण चार लाख रुपये किंमत असलेले हे कृषिड्रोन शेतकऱ्यांसाठी ४५ टक्के सबसिडीवर उपलब्ध आहे. ग्रामीण भागात रोजगारनिर्मितीचा कंपनीचा मानस असून, तरुणांना ७० टक्क्यांपर्यंत सबसिडी उपलब्ध करून देत रोजगार उपलब्ध होणार आहे. ज्याप्रमाणे एखाद्या गावात चार ट्रॅक्टर संपूर्ण गावातील शेतकऱ्यांसाठी उपयोगात येतात त्याच धर्तीवर आता ड्रोनही उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

Agriculture Innovation
Jalgaon : बापरे..! जिल्ह्यात ४२० जणांना चावले पिसाळलेले कुत्रे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.