Agriculture Update : परतीच्या पावसाने ‘खरीपा’वर फिरले पाणी ; सरसकट भरपाईची मागणी

Agriculture News
Agriculture News esakal
Updated on

पाचोरा : तालुक्यात परतीच्या पावसाने अक्षरशः थैमान घातले असून, तोंडाशी आलेल्या खरीप उत्पादनावर पाणी फिरवले आहे. यामुळे बळीराजाचे आर्थिक व मानसिक बळ संपुष्टात आले असून, शासनाने बळीराजाला पुन्हा दमदारपणे उभे करण्यासाठी पंचनामे, अहवाल अशी प्रक्रिया न करता सरसकट नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. यावर्षी तालुक्यात रोहिणी नक्षत्र कोरडे गेले असले तरी मृग नक्षत्रापासून पावसाने योग्य प्रमाणात व वेळेवर हजेरी लावली.

बहुतांश पेरण्या मृग नक्षत्रातच पूर्ण झाल्या होत्या. कापूस पिकाचा पेरा सर्वाधिक होता व पिकेही चांगली होती. त्यामुळे यंदा चांगले उत्पादन येईल, अशी अपेक्षा होती. परंतु या खरीप उत्पादनाला पावसाची दृष्ट लागली. कापूस वेचणी, सोयाबीन, मका, ज्वारी, बाजरी काढणीची कामे सुरू असताना व खरीप उत्पादनाच-ा शेतमाल शेतातून घरी आणण्याची वेळ असताना परतीच्या पावसाने अक्षरशः थैमान घातले .गेल्या आठवडाभरापासून कमी जास्त प्रमाणात तालुक्यात सर्वत्र परतीचा पाऊस होत असल्याने खरीप उत्पादनावर पाणी फिरले आहे.(Agriculture Update Returning rains caused water to flow on Kharip Demand for compensation Jalgaon Agriculture News)

Agriculture News
पहिली असतांना दुसरीसोबत थाटला संसार ; Mobile Searchingमध्ये ‘अशीही बनवाबनवी ’ उघडकीस

कापूस ओला झाला असून उर्वरित कैऱ्या सडल्या आहेत. सोयाबीन व मका कापून ठेवल्याने त्यास कोंब फुटू लागले आहेत. ओले झालेले धान्य व कापूस वाळवण्या इतपत ऊन नाही. तसेच ओला झालेला व सडलेला शेतमाल व्यापारी अत्यंत कमी भावात मागत आहेत.

त्यामुळे ऐन दिवाळीच्या आनंदात शेतकऱ्यांवर नुकसानीचे दुःख कोसळले आहे. शासनाने या नुकसानीची दखल घेऊन पंचनामे, नुकसान भरपाईचा अहवाल या प्रक्रियेच्या भानगडीत न पडता बळीराजाला पुन्हा उभे करण्यासाठी इतर राज्यातील पॅटर्न प्रमाणे महाराष्ट्रात सरसकट नुकसान भरपाई देण्याचे धोरण राबवावे व त्वरित नुकसान भरपाई द्यावी. त्यामुळे निदान शेतकऱ्याला रब्बीच्या आशेवर तरी जगता येईल. असा सूर व्यक्त होत आहे.

Agriculture News
Diwali Update : दरात 15 ते 20 टक्के वाढ; व्यापारी बांधवांची वह्यांना मागणी

"यावर्षी आतापर्यंत खरीप उत्पादनाची पिके चांगली होती. त्यामुळे यंदा शेतकऱ्यांवरील आर्थिक संकट नष्ट होईल, अशी अपेक्षा होती. परंतु परतीच्या पावसाने होत्याचे नव्हते केले. शेतकरी आर्थिक गर्तेत अडकला असून, शासनाने सरसकट नुकसान भरपाईचे धोरण त्वरित राबवावे."

- दगाची वाघ , शेतकरी, राणीचे बांबरुड

"शेतकऱ्यांवरील आर्थिक संकट गडद झाले आहे. रब्बी उत्पादन कसे घ्यावे? हा प्रश्न शेतकऱ्यांपुढे आहे. शेतकऱ्याला आधार व धीर देण्यासाठी शासनाने सरसकट भरपाईचे धोरण राबवून त्याचे वाटप सुरू करावे. अन्यथा शेतकरी पुन्हा उभारणे शक्य नाही."

- सतीश चौधरी शेतकरी, पाचोरा

Agriculture News
Diwali Update : शेतकऱ्यांची दिवाळी अंधारातच ; अतिवृष्टीचे अनुदान खात्यावर पडायला विलंब

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()